neena 
मनोरंजन

नीना गुप्ता यांच्या आत्मचरित्रातील ६ धक्कादायक खुलासे

इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचपासून मोडलेल्या लग्नापर्यंत...

स्वाती वेमूल

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्ता यांचं 'सच कहूँ तो' हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित करण्यात आलं. या आत्मचरित्रात नीना यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी आणि इंडस्ट्रीतील काही गोष्टींविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. हे खुलासे कोणते ते जाणून घेऊयात..

मसाबाच्या जन्माच्या वेळी नीना यांच्याकडे डिलिव्हरीसाठी पैसेसुद्धा नव्हते

मुलगी मसाबाच्या जन्मावेळी नीना यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. याविषयी त्यांनी पुस्तकात लिहिलं असून त्याचा काही भाग मसाबाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मसाबाच्या जन्माच्या वेळी नीना यांच्या बँक अकाऊंटमध्ये फक्त २००० रुपये होते, असं त्यात म्हटलंय. जर सी-सेक्शन डिलिव्हरी झाली तर त्यासाठी अधिकचे १० हजार रुपये लागणार होते. सुदैवाने डिलिव्हरीच्या काही दिवस आधी टॅक्स रिइंबर्समेंटचे दहा हजार रुपये खात्यात जमा झाले आणि नीना यांना डिलिव्हरीचा खर्च उचलता आला.

प्रेग्नंट नीना यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी

नीना गरोदर असताना सतीश कौशिक यांनी लग्नाबद्दल त्यांना विचारलं होतं. 'काळजी करू नकोस, जर बाळ सावळ्या रंगाचा जन्मला, तर तू थेट म्हण की ते माझं मूल आहे आणि आपण दोघं लग्न करू. कोणाला कसलाच संशय येणार नाही', असं ते नीना यांना म्हणाले होते. माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये असताना नीना गरोदर राहिल्या होत्या. ८० च्या दशकात या दोघांचं रिलेशनशिप फार चर्चेत होतं. नीना यांना मसाबा गुप्ता ही मुलगी असून त्यांनी एकटीनेच तिचं संगोपन केलं.

गर्भवती नीना यांना समलैंगिकाशी लग्न करण्याचा दिला होता सल्ला

लग्न न करता गरोदर राहिल्यामुळे नीना यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सच्या प्रेमात त्या पडल्या होत्या. मात्र नीना गर्भवती राहिल्यानंतर विवियनने त्याची पत्नी आणि कुटुंबाला सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. नीना या गरोदर असताना त्यांच्या एका मित्राने मुंबईतील समलैंगिक व्यक्तीशी लग्न करण्याचा सल्ला त्यांना दिला होता. सामाजिक आयुष्यातील ताणातून मुक्त होण्यासाठी संबंधित समलैंगिक व्यक्तीला लग्न करायचं होतं, असं सुजॉयने नीना यांना सांगितलं होतं. लग्नानंतर त्या व्यक्तीने नीना यांच्या मुलीचा स्वीकार केला असता, मात्र नीना आणि त्यांच्या कुटुंबापासून ती व्यक्ती लांबच राहणार होती. कोणताही चुकीचा निर्णय न घेता आयुष्यातील घटनांना सामोरं जाण्याचा निर्णय नीना यांनी त्यावेळी घेतला होता.

'ऐनवेळी त्याने फोन करून लग्नास नकार दिला'

आत्मचरित्रात उल्लेख केलेल्या एका घटनेबाबत नीना गुप्ता म्हणाल्या, 'माझ्या आयुष्यात एक मुलगा होता ज्याच्यासोबत मला लग्न करायचे होते. मी लग्नासाठी खरेदी करत होती. पण ऐनवेळी त्याने मला फोन केला आणि सांगितले की मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छित नाही. मला समजले नाही की त्याने लग्नाला नकार का दिला? मला आजपर्यंत समजलेलं नाही की, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. पण मी काहीच करु शकत नाही. मी माझ्या आयुष्यात पुढे निघून आले. पण त्या व्यक्तीशी लग्न झालं असतं तर मला आनंद झाला असता. त्याच्या आई-वडिलांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांच्या घरी राहत होते. तो आता त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. त्याची मुलं आहेत.'

'चोली के पीछे क्या है' गाण्याचा किस्सा

'चोली के पीछे क्या है, हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मला ते आवडलं. पण गाणं शूट करताना मी खूप नर्व्हस होते. मला गुजराती आदिवासी कपडे देण्यात आले होते आणि गाण्यासाठी तयार झाल्यानंतर मला सुभाष घई यांच्याकडे पाठवलं. मी पूर्ण तयार होऊन त्यांच्यासमोर उभी राहिले आणि त्यांनी मला पाहताच, नो नो नो, कुछ भरो.. असं म्हणत ओरडू लागले. ते ऐकून मला खूप ओशाळल्यासारखं झालं. माझ्या मते, ते माझ्या ब्लाऊजबद्दल बोलत होते. त्या दिवशी मी शूटिंग केले नाही. नंतर दुसऱ्या दिवशी मी सेटवर पोहोचले तेव्हा मला हेवी पॅडेड ब्रा दिली गेली होती', असं त्यांनी पुस्तकात लिहिलं.

ट्रिप कॅन्सल केल्याने विवियन रिचर्ड्सने धरला पाच वर्षांसाठी अबोला

मसाबा ही नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. ती जेव्हा लहान होती, तेव्हा वडिलांना भेटण्यासाठी मायलेकी तयार झाल्या होत्या. मात्र त्याचवेळी मसाबाला शाळेत दाखल करायचं होतं. शाळेत दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख आणि विवियनला भेटण्याची तारीख एकच आली होती. म्हणून नीना यांनी विवियनला नंतर भेटायला येऊ असं सांगितलं होतं. मात्र रागाच्या भरात विवियनने नीना यांचा फोन कट केला आणि त्यापुढे पाच वर्षांपर्यंत कधीच संपर्क केला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT