neetu kapoor birthday : एके काळी ऋषी कपूर (rushi kapoor) यांच्या काही चित्रपटांतून बॉलीवूड गाजवणारी नीतू कपूर या ऋषी यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी सोशल मीडियावर सक्रिय झाल्या. त्यांच्या मृत्यूनंतर नीतू कपूरने स्वत:ला सावरण्यासाठी टिव्ही आणि सोशल मीडियाचा आसरा घेतला. रडण्याऐवजी नीतूने स्वत:ला व्यस्त करत सावरण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनेकांनी त्यांना ट्राेलही केले पण नीतू (neetu kapoor) यांनी सगळ्यांने सडेतोड उत्तर देत काम सुरु ठेवले. अशा बिनधास्त नीतू कपूर यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया काय होतं ते प्रकरण..
(neetu kapoor birthday : Neetu Kapoor answered to trolls after rishi kapoor death)
अभिनेत्री नीतू कपूर आता 65 व्यय वर्षात पदार्पण करत आहेत. विविध रिअलिटी शो, रणबीर- आलियाचं लग्न आणि नुकतीच आलियानं दिलेली गोड बातमी यामुळे नीतू कपूर गेली काही दिवस सतत चर्चेत असतात. पण नीतू कपूर यांनी ऋषि यांच्या निधनानंतर दाखवलेलं धाडस हे वाखणण्याजोगे आहे. 30 एप्रिल 2020 रोजी ऋषि यांचे निधन झाले. त्यांनंतर नीतू कपूर यांना मोठा धक्का बसला होता. पण अशावेळी खचून न जाता त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. त्या रिअलिटी शो मध्ये जज म्हणून आल्या. शिवाय सोशल मिडियावरही त्या बऱ्याच सक्रिय झाल्या. पण लोकांना ते पहावलं नाही. लोकांनी नीतू यांच्यावर सडकून टीका केली.
'पतीच्या निधनानंतर रडण्याऐवजी एन्जॉय काय करताय', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. यावर बरीच चर्चा झाली, पण नीतू कपूरनेही याला सडेतोड उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या 'अशा ट्रोलर्सला मी लगेच ब्लॉक करते. काही जण रडून स्वत:ला सावरतात तर काही जण हसून. मी ऋषीला कधीच विसरू शकत नाही. पण मला कामातून आनंदी राहूनच यातून बाहेर पडता येईल'असे त्या म्हणाल्या होत्या.
पुढे त्या म्हणाल्या होत्या, 'मला आवडतं ते मी करते. मला माझे फॉलोअर्स आवडतात. जे लोक मला ट्रोल करतात त्यांना मी सरळ ब्लॉक करते. काही म्हणायचे,पतीचं निधन झालं आणि ही इकडे एन्जॉय करतेय. त्यांना रडणारी विधवा बघायची होती. मी अशांना ब्लॉक करते. मी असं म्हणेल यावर की मला असंच राहायला आवडतं आणि मी अशीच राहाणार. अशाच पद्धतीने मी स्वत:ला सावरते. काही जण रडून स्वत:ला सावरतात तर काही जण हसून.(Rishi Kapoor)मी ऋषीला कधीच विसरू शकत नाही.ते माझ्यासोबत आणि माझ्या मुलांसोबत कायम इथेच आहे. आजही जेव्हा आम्ही जेवायला सोबत बसतो तेव्हा अर्धा तास त्यांच्याच बद्दल बोलत असतो. रणबीरच्या स्क्रीनसेव्हरवरही ऋषीचाच फोटो असतो. त्यामुळे त्याला आठवताना रडायची गरज नाही. त्याच्या आठवणींनी आमच्या चेहऱ्यावर हसू येतं,'असे त्या म्हणाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.