Netflix New Seasons Video  esakal
मनोरंजन

Netflix New Seasons Video : नेटफ्लिक्सकडून मोठी घोषणा, आता 5 वेबसीरिजच्या...

सकाळ डिजिटल टीम

Netflix Announces Season 3 Of 5 Web Series : टीव्ही मनोरंजनामध्ये जेव्हा ओटीटीची इंट्री झाल्यानंतर अनेक गोष्टीं झपाट्यानं बदलला. आता तर चित्रपट देखील ओटीटीवर प्रदर्शित होऊ लागले आहे. त्यामुळेच की काय येत्या काळात ओटीटीचा दबदबा वाढताना दिसतो आहे. यासगळ्यात ओटीटी विश्वातील सर्वात प्रभावी ओटीटी असणाऱ्या नेटफ्लिक्सनं पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे.

नेटफ्लिक्सवर अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपट आहेत. जगामध्ये सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग हा नेटफ्लिक्सचा असल्याचे दिसून आले आहे. ओटीटी माध्यमांमध्ये नेटफ्लिक्सनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र त्याला भारतात म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांनी त्याबाबत गांभीर्यानं पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

Also Read - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

आता नेटफ्लिक्सनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये येत्या काळात लोकप्रिय अशा त्या पाच वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. चाहते, नेटकरी हे गेल्या काही दिवसांपासून त्या मालिकांच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत होते. नेटफ्लिक्सनं त्यांच्या प्रदर्शनाविषयी माहिती दिली आहे. निर्मात्यांनी एक प्रोमो व्हायरल करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दिल्ली क्राईम -

दिल्लीत सातत्यानं होणाऱ्या क्राईमच्या घटनांवर अद्याप म्हणावी अशी कारवाई झालेली नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांवर मोठा दबाव आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शहा यांच्या अभिनयामुळे या मालिकेची मोठी चर्चा झाली होती. त्याच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचा तिसरा सीझन येणार आहे.

शी -

आदिती पोहनकरला या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाल्याचे दिसून आले. शी नं कमीवेळात आपला चाहतावर्ग तयार केला. प्रेक्षकांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मुंबईतील ड्रग्ज माफिया आणि अंडरवर्ल्डच्या जगातील भयानक गुन्हे उघडकीस आणण्याचे काम शी मालिकेनं केले होते.

कोटा फॅक्टरी -

द व्हायरल फिव्हर निर्मित कोटा फॅक्टरीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावर या मालिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातील कंटेट हा तरुणाईच्या चर्चेचा विषय होता. या मालिकेचा पहिला सीझन हा २०१९ मध्ये आला होता.

मिसमॅच -

या रोमँटिक मालिकेमध्ये रोहित सराफनं ऋषी शेखावतची जी भूमिका साकारली आहे त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. प्रेक्षकांना आता या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचे वेध लागले आहेत. या मालिकेची सुरुवात २०२० मध्ये झाली होती. प्राजक्ता कोळीनं देखील मिसमॅचमधून चाहत्यांची पसंती मिळवली होती.

द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाईव्स -

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या या मालिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. निलम कोठारी, सीमा सजदेह, भावना पांडेय, महीप कपूर यांच्या या मालिकेनं नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला होता. या मालिकेची सुरुवात २०२० मध्ये झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Latest Marathi News Updates : अमेरिकेत फेलोशिपसाठी आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची नियुक्ती; भारतातून निवड झालेल्या ठरल्या एकमेव अधिकारी

SCROLL FOR NEXT