New Series 'One Nation' on Rss by 6 National Award-Winning Directors poster out Esakal
मनोरंजन

One Nation: RSS चा शंभर वर्षांचा प्रवास आता मोठ्या पडद्यावर! राष्ट्रीय पुरस्कार विजेते सहा दिग्दर्शक येणार एकत्र

Vaishali Patil

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता अनेक वर्षे पूर्ण झाली आहेत. 1925 मध्ये दसऱ्याच्या दिवशी डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आता RSS संघाच इतक्या वर्षाचा इतिहास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. RSS चा सफरनामा पडद्यावर प्रेक्षकांना पाहत येणार आहे.

RSS संघाच्या प्रवासावर एक वेब सिरिज तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी 'वन नेशन' नावाच्या वेब सीरिजचे पहिले पोस्टर रिलिज करण्यात आले आहे.

या वेब सिरिजमध्ये RSS चा 100 वर्षांचा प्रवास आणि संघाने राष्ट्रासाठी केलेले योगदान दाखवले जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेब सिरिजचे दिग्दर्शन एक किंवा दोन दिग्दर्शक नव्हे तर तब्बल सहा दिग्दर्शक करणार आहेत आणि ते सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. या दिग्दर्शकाच्या नावाच्या यादीत प्रियदर्शन, विवेक अग्निहोत्री, डॉ. चंद्र प्रकाश द्विवेदी, जॉन मॅथ्यू माथन, मंजू बोरा आणि संजय पूरण सिंग चौहान यांचा सामावेश आहे.

या वेबसरिजिची घोषणा करताना निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेयर केले आहे. 'वन नेशन' या मालिकेचे पहिले पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये एक तरुण संघाचे कपडे घालून उभा दिसत आहे. आता या मालिकेत आरएसएसच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

मात्र या चित्रपटात कोणकोणते कलाकार महत्वाची भुमिका साकारणार आणि चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत काही माहीती समोर आलेली नाही.

या सिरिजची घोषणा करताना निर्माते म्हणाले की, या वेब सरिजद्वारे आरएसएसबद्दल लोकांना जास्त माहिती मिळेल. त्यांचे योगदान अधोरेखित केले जाईल. देशाची एकता आणि अखंडता वाढण्यास मदत करण्यासाठी ही मालिका उपयोगी ठरेल.

आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त 2025 मध्ये 'एक राष्ट्र' वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान हे फक्त एक पुस्तक नाही' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT