Nimrit kaur and Archana gautam fight for chicken bigg boss 16 sakal
मनोरंजन

Big boss 16: काय करायचं यांचं! चिकनसाठी अर्चना आणि निम्रतमध्ये राडा.. अन् शेवटी ताबा सुटलाच..

बिग बॉस 16 आता अंतिम टप्प्यात.. राडाही झाला दुप्पट..

सकाळ डिजिटल टीम

bigg boss 16: बिग बॉस 16 च्या फिनालेला आता फक्त 12 दिवस बाकी आहेत. आणि दिवसेंदिवस हा शो अजून रंजक होत चालला आहे. घरातील सदस्य आता अधिक आक्रमक होत असून एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत त्यांची मजल जात आहे.

घरातील मंडळी एकीकडे आणि प्रियंका -अर्चना एकीकडे अशी स्थिती आहे. गेल्या एपिसोडमध्ये टीना दत्ताला घरातून बाहेर काढण्यात आलं, तर आता निम्रत आणि अर्चना मध्ये जबरदस्त भांडण झालं आहे. अत्यंत क्षुल्लक कारणावरून हा राडा झाला.

(Nimrit kaur and Archana gautam fight for chicken bigg boss 16)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

गेल्या काही दिवसात शिव आणि प्रियंका मध्ये जबरदस्त वाद झाल्यानंतर आता निम्रत आणि अर्चना मध्ये जबरदस्त भांडण झालं आहे. या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये वातावरण खूप तापले आहे.

बिग बॉस फिनालेचे तिकीट मिळविण्यासाठी एक शेवटची संधी मिळाली आहे. ज्यामध्ये निम्रत प्रियांकाला पहिल्यांदा शर्यतीतून बाहेर काढते. तर प्रियंका शालीनच्या आजाराचे कारण सांगून त्याला खेळातून बाहेर काढते. त्यामुळे त्यांच्यातील तेढ वाढली आहे.

शेवटी, एका सदस्याला जाऊन उरलेल्या स्पर्धकांना बाहेर काढावे लागते, परंतु प्रियांका पुढे नकार देते. ती म्हणते की, आता ती इथपर्यंत पोहोचली आहे, तिने फायनलमध्येही पोहोचले पाहिजे. दुसरीकडे, निम्रत म्हणते की जर तुम्ही विचार करत असाल की एमसी त्याच्या मित्राला बाहेर काढेल, तर तो तसे करणार नाही.

त्याच वेळी, अर्चना आणि निम्रतेत युद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शालीनच्या चिकन वरून घरात वाद सुरू झाला. ज्यानंतर अर्चनाची वृत्ती पाहून निम्रतचा संयम सुटला आणि ती थेट अर्चनावर भडकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT