Karan Mehra and Nisha Rawal 
मनोरंजन

'करणचे विवाहबाह्य संबंध, याआधीही त्याने माझ्यावर हात उचलला'

निशाचा धक्कादायक खुलासा

स्वाती वेमूल

'ये रिश्ता क्या कहलाता है' Yeh Rishta Kya Kehlata Hai या मालिकेतील अभिनेता करण मेहरा Karan Mehra आणि त्याची पत्नी निशा रावल Nisha Rawal यांचा कौटुंबिक वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. सोमवारी निशाने पती करणविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जामिनावर सुटल्यानंतर करणने पत्नीवर काही आरोप केले. "निशाने स्वत: तिचं डोकं भिंतीला आपटलं आणि माझ्यावर आरोप केले", असं तो म्हणाला. याउलट नंतर निशाने माध्यमांशी बोलताना तिची बाजू मांडली. "करणचे विवाहबाह्य संबंध असून त्याने याआधीही माझ्यावर हात उचलला होता", असा खुलासा निशाने केला. गेल्या चौदा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. २०१२ मध्ये करण-निशाने लग्न केलं असून त्यांचा चार वर्षांचा मुलगा आहे. सध्या करण आणि निशा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. (Nisha Rawal accuses Karan Mehra of having an affair says he used to hit her)

काय म्हणाली निशा?

"गेल्या काही दिवसांपासून आमच्यात वाद सुरू होते. करणसोबत बोलून मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या होत्या. पण रागाच्या भरात त्याने बेडरुममधून बाहेर जाताना माझे केस पकडून डोकं भिंतीला आपटलं. त्याच्या विवाहबाह्य संबंधांविषयी मला नुकतंच समजलं होतं. करणनेसुद्धा या गोष्टीला मान्य केलं. तरीसुद्धा मी काही गोष्टी समजून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याला त्याच्या चुकीची जाणीवसुद्धा नाही. म्हणून मी घटस्फोटाचा निर्णय घेतला", असं निशाने सांगितलं. यावेळी निशाने तिच्या डोक्यावर झालेल्या दुखापतीचे फोटोसुद्धा दाखवले.

निशाने स्वत:चं डोकं आपटलं आणि आरोप माझ्यावर केले, या करणच्या आरोपांना तिने फेटाळले. "मी एक अभिनेत्री असून, स्वत:ला शारीरिकदृष्ट्या जखमी करायचा विचारसुद्धा करू शकत नाही. माझं पोट माझ्या कामामुळे भरतं, अशावेळी मी का स्वत:वर वार करून घेईन", असा प्रतिप्रश्न तिने केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यास सत्य बाहेर येईल, असं करणचं मत आहे. दरम्यान, निशा आणि करणच्या बाजूने टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकारसुद्धा व्यक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

Warora Assembly Election Result 2024 : वरोरामध्ये गुलाल भाजपचाच! करण देवतळे 65170 मतांनी विजयी

Kalyan Rural Election Result 2024 : कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 396 मतांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT