Nita Mukesh Ambani Cultural Centre Varun Dhawan  esakal
मनोरंजन

Varun Dhawan : हॉलीवूडची अभिनेत्री पाहिली, वरुणची सटकली! त्यानं चक्क स्टेजवरच...

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख ते रणवीर सिंग पर्यत बऱ्याचशा अभिनेत्यांच्या परफॉर्मन्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Nita Mukesh Ambani Cultural Centre Varun Dhawan : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सुरु असणाऱ्या इव्हेंटसच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनाचा तडका सुरुच होता. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनच्या त्या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे.

बॉलीवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रेटी या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये बॉलीवूडचा किंग खान शाहरुख ते रणवीर सिंग पर्यत बऱ्याचशा अभिनेत्यांच्या परफॉर्मन्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि आलिया भट्ट यांच्या परफॉर्मन्सला देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी त्यांनी आयपीएलच्या सोहळ्याच्यावेळी केलेल्या सादरीकरणानं चाहत्यांना जिंकून घेतले होते.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

यासगळ्याच चर्चा होती ती त्या वरुण धवनच्या परफॉर्न्सची. त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. वरुण धवन आणि हॉलीवूडची सुपर मॉडेल जीजी हदीद यांचा तो व्हिडिओ आहे. मात्र असे काय झाले की त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली? वरुण हा त्याच्या रोमँटिक अंदाजासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. सध्याच्या नव्या अभिनेत्यांमध्ये तो लोकप्रियही आहे.

सध्याच्या कल्चरल इव्हेंटमध्ये वरुणचा देखील एक परफॉर्न्स होता. यावेळी त्यानं डान्स सुरु असताना जीजीला स्टेजवर बोलावले. तिला सगळ्यांसमोर उचलून घेत किस केले. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे वरुणला मोठ्या प्रमाणावर नेटकरी ट्रोल करताना दिसत आहे. त्याला दिलेल्या प्रतिक्रिया देखील भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT