Nitesh Pandey, Nitesh Pandey wife, Nitesh Pandey funeral, Nitesh Pandey death SAKAL
मनोरंजन

Nitesh Pandey Funeral: नितेश पांडेंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बायको अन् मुलाचा रडून आक्रोश, रुपाली गांगुलीचा रडून बांध फुटला

नितेश पांडेंचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले

Devendra Jadhav

Nitesh Panday Funeral News: अनुपमा अभिनेता नितेश पांडे यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. नितेश पांडेंचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अंत्यविधीच्या आधी मुंबईतील त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. जिथे नितेशला निरोप देण्यासाठी अनेक टीव्ही सेलेब्स आले होते.

(Nitesh Pandey's Son and wife Cries Inconsolably At Anupamaa Actor Funeral anupama fame rupali ganguly also breakdown

नितेशसारखा प्रतिभावान अभिनेता आता आपल्यात नाही यावर विश्वास बसणे कठीण आहे. त्याची पत्नी आणि मुलगा किती वेदना सहन करत असतील याची कल्पनाही करू शकत नाही. नितेश पांडे यांचा मुलगा वडिलांचा मृतदेह पाहून धाय मोकलून रडला. आपल्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृतदेह पाहून तो म्हणाला, ‘पापा ये क्या होगया’. नितेशच्या पत्नीसह कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या पत्नी आणि मुलाला खंबीर राहण्यास सांगून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.

नितेश पांडे यांच्यावर २४ मेला रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान अभिनेत्याचे जवळचे मित्र आणि टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटी त्याच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले. नितेश पांडेची जवळची मैत्रीण आणि त्याची अनुपमा मालिकेतली को-स्टार रुपाली गांगुलीच्या अश्रूंचा बांध फुटला. रुपाली नितेशचं रडतच तिच्या गाडीत. एक दिलखुलास माणूस आणि एक हरहुन्नरी कलाकार आपल्यातून गेला याचं सर्वांना दुःख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT