मनोरंजन

Nitin Desai Death: मराठी माणसाने पाहिलेलं सर्वात मोठं स्वप्न ND स्टुडिओ, नितीन देसाई यांनी राखेतून उभारलेलं साम्राज्य!

Vaishali Patil

Nitin Desai News : आज मनोरंजन विश्वातुन एक धक्कादायक बातमी समोर आली ज्याने सर्वानाच मोठा धक्का बसला. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेतला. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. इतकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाल्यावर सुद्धा असं टोकाचं पाऊल का उचलल याचा तपास आता पोलिस करत आहे.

नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.

त्यांनी एक मोठं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलंही. 2005 मध्ये त्यांनी मुंबईजवळील कर्जत येथे 52 एकरात भव्य असा एनडी स्टुडिओ उघडला. कर्जत हे मुंबईपासून 65 किमी अंतरावर आहे. गेल्या कित्येक वर्षापासून त् बॉलिवूडचं नव्हे तर सर्वांचच आवडतं शूटिंग डेस्टिनेशन आहे.

21 हेक्टर मध्ये पसरलेला हा स्टुडिओनंतर रिलायन्स एंटरटेनमेंटने 50 टक्के हिस्साने जवळपास1.50 अब्ज रुपयांना विकत घेतला. या सेटवर पहिल्यांदा 'राजा शिवछत्रपती' या मराठी मालिकेसह टीव्ही मालिका निर्माण करण्यास सुरुवात केली.

52 एकरात हा भव्य पसरलेला स्टुडिओ एखाद्या छोट्या शहरापेक्षा कमी नाही. ज्यात मोठे किल्ला,बाजारपेठ, मोठी हवेली, मंदिर, गाव अशी ठिकाणं तयार झाली आहेत. 'हम दिल दे चुके सनम'ची ती हवेली ज्यात ऐश्वर्या रॉय रहाय ती हवेलीही स्टुडिओमध्ये बनवण्यात आली होती.

इतकच नाही तर हृतिक रोशन-ऐश्वर्याच्या जोधा-अकबर चित्रपटातील अकबरचा किल्ला आणि राजवाडा देखील या स्टुडिओत बांधण्यात आला होता. या स्टुडिओमध्ये अनेक भव्य चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

या स्टुडिओच्या स्थापनेबाबत त्यांनी बऱ्याचदा सांगतिलं होतं. ब्रॅड पिटच्या चित्रपटात काम न करण्याच्या इच्छेने त्यांनी एनडी स्टुडिओची स्थापना केली होती.

अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन यांनी नितीन यांना नोकरीची ऑफर दिली. त्याच्यासोबत ते लडाख, उदयपूर, महाराष्ट्र अशा अनेक शहरांना 9 दिवस भेट दिली होती. ते ब्रॅड पिटसोबत अलेक्झांडर द ग्रेट बनवणार होता.

त्या चित्रपटाचा काही भाग त्यांना भारतात शूट करायचा त्यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रपट बनवण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल असा स्टुडिओ बनवावा अशी कल्पना त्यांना सुचली आणि बरीच ठिकाणं शोधल्यानंतर त्यांनी कर्जतमध्ये ND स्टुडिओ उभारण्याची संधी मिळाली.

नितीन देसाई यांनी स्टुडिओमध्ये थीम पार्कही तयार केला आहे. अनेकांची जोधा-अकबर बाजीराव-मस्तानीच्या लूकमध्ये लग्न करण्याची अनेकांची इच्छा असते, त्यासाठी आता त्यांनी या एडीत स्टुडिओ डेस्टिनेशन वेडिंग सुरू केले आहेत.

आमिर खानच्या 'मंगल पांडे- द रायझिंग' या चित्रपटाचं पहिल्यांदा शूटिंग त्यानंतर मधुर भांडारकरचा 'ट्रॅफिक सिग्नल' आणि आशुतोष गोवारीकर यांचा सुपरहिट 'जोधा अकबर' याच सेटवर शुट झाला. वॉन्टेड, बॉडीगार्ड, प्रेम रतन धन पायो, किक या सलमान खानच्या प्रत्येक मोठ्या चित्रपटांचं शूटिंग येथे झाले आहे.

स्टुडिओमध्ये जोधा अकबरच्या सेटच्या मागे एक गोडाऊन होता त्यात आग लागली होती. त्यावेळी किमान 20 ते 30 लाखांचे नुकसान झाले होते. मात्र नितीन चंद्रकांत यांनी त्याचं साम्राज्य पुन्हा निर्माण केलं

अनेक कलाकारांच्या आठवणी या स्टुडिओसोबत जोडल्या गेल्या होत्या. 'जोधा अकबर' हृतिक रोशन-ऐश्वर्या यांनी बराच वेळ घालवला होता. सलमान खानलाही कोणताही चित्रपट शुट करायचा असल्याचं तो हाच एनडी स्टुडिओची निवड करायचा. तर रेखा यांनी त्या स्टुडिओ एक छोटी खोली त्यांना द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा हे

मा मालिनी या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा आल्या तेव्हा तिची भव्यता पाहून त्या थक्क झाल्या होत्या. नितीन चंद्रकांत देसाई या जगात नसले तरी त्याचा हा स्टुडिओ त्याच्या आठवणी कायम ताज्या ठेवेल यात काही शंकाच नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT