Nitin Desai Bollywood Art Director Passed Away esakal
मनोरंजन

Nitin Desai Death: नितीन देसाईंच्या आत्महत्येमागं कारण काय? स्थानिक आमदारानं व्यक्त केला संशय

नितीन देसाई यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीतील अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्जतमधील आपल्या एनडी स्टुडिओतच त्यांनी गळफास घेतला.

पण त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत पोलीस शोध घेत आहेत. मात्र, स्थानिक उरण-खालापूरचे आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या मृत्यूमागे आर्थिक कारण असल्याचा संशय़ व्यक्त केला आहे. (Nitin Chandrakant Desai Death local MLA Mahesh Baldi expressed reason behind it)

आर्थिक विवंचनेमुळं आत्महत्या?

बालदी म्हणाले, "एक-दीड महिन्यापूर्वी जेव्हा आमची भेट झाली होती तेव्हा स्टुडिओमुळं ते आर्थिक विवंचनेत होते, असं त्यांनी मला सांगितलं होतं. आज सकाळी चार वाजता त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

आमचे तिथले प्रमुख कार्यकर्त सुधीर ठोंबरे यांनी मला सकाळी साडेआठ वाजता याची फोनवरुन माहिती दिली. नितीन देसाई यांनी कर्जमधील स्थानिक मुलांना आपल्या स्टुडिओत काम दिलं होतं. त्यांच्याकडून आम्हाला हे कळलं की ते आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळं त्यांच्या आत्महत्येचं प्राथमिकदृष्ट्या दुसरं कारण सध्या दिसत नाही" (Latest Marathi News)

चित्रपट चालत नसल्यानं तणावात?

आपले चित्रपट चालत नाहीत, त्यांचा पुढचा चित्रपट येतोय असंही देसाईंनी आमदार बालदी यांना मागच्या भेटीत सांगितलं होतं, असं स्वतः आमदार बालदी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं होतं. चित्रपट जर चालला नाही तर त्यामागचं गणितच बिघडतं. (Marathi Tajya Batmya)

एक दीड वर्षांपासून त्यांचा कुठला सिनेमा चांगला चाललेला नाही. ते काही टीव्ही सिरियल्सवरही काम करत होते. पण त्यातून त्यांची आर्थिक गाडी रुळावर येत नसल्याची स्थिती होती. त्यामुळं आजचा हा दुःखद दिवस आपल्याला दिसला आहे, असंही बालदी यांनी सांगितलं आहे.

'रायगडा'बाबत होते संवेदनशील

रायगड किल्ला चांगला दिसला पाहिजे यासाठी ते खूपच प्रयत्नशील होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडला भेट दिली तेव्हा त्यांनीच तिथं मोठा सेट लावला होता. त्यामुळं त्या सेटप्रमाणंचं रायगडचं सौंदर्य देखील उजळून निघावं अशी इच्छा असलेला देसाई हे चांगले व्यक्ती होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT