Nitin Chandrakant Desai Death ND Studio : रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये असणाऱ्या एनडी स्टुडिओची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरामध्ये होते. तो स्टुडिओ उभारण्यासाठी रक्ताचं पाणी करुन नितीन देसाई यांनी संघर्ष केला. स्वताची वेगळी ओळख निर्माण केली. शून्यातून सुरुवात करुन एक भव्य स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. आज त्या स्वप्ननगरीचा निर्माता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींना उधाण आले आहे. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत काम करत आपल्या नावाची वेगळी छाप उमटवण्यात देसाई यांनी उमटवली. भारताबाहेरही त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. तब्बल चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या नितीन देसाईंच्या कामाची दखल जागतिक पातळीवर देखील घेतली गेली होती.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
देसाई यांनी आत्महत्या का केली याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहे. त्यापैकी एक जास्त चर्चेत असणारी शक्यता म्हणजे त्यांनी बँकेकडून घेतलेले १८० कोटींचे कर्ज. ते त्यांच्यासाठी डोईजड झाले होते. दुसरे म्हणजे त्यांनी काही गेल्या महिन्यांपासून थकीत बाकीवरील व्याजही भरणं बंद केले होते. त्यामुळे ते आणखी अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे. नितीन यांच्या आत्महत्येबाबत काही धक्कादायक गोष्टी समोर येत असल्याचे दिसून आले आहे.
असं म्हटलं जातं आहे की, नितीन देसाई हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तंगीमध्ये होते. त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून तब्बल १८० कोटींचे कर्जही घेतले होते. ते वेगवेगळ्या कर्जांमध्ये बुडाले होते. असंही म्हटलं जातं आहे की,नितीन यांनी त्यांची प्रॉपर्टी तारण ठेवली होती. त्यांना सप्टेंबरमध्ये कलेक्टरचे पत्रही आले होते.
यासगळ्यावर FWICE च्या अध्यक्ष बीएन तिवारी यांनी म्हटले आहे की, तीन महिन्यांपूर्वी आमची भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्या स्टुडिओमध्ये किमान १५० माणसं काम करत होती. त्यांनी प्रति महिना पगार या तत्वावर कर्मचारी कामाला ठेवले होते. मात्र स्टुडिओ चालविण्यासाठी येणारा प्रचंड मोठा होता. दोन ते तीन वर्षांपासून तो तोट्यात होता.त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक निर्णयांवर झाला.
देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओमध्येच आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येच्या आदल्या दिवशी दिल्लीवरुन आले होते. त्यानंतर रात्री आपल्या रुममध्ये गेले. दुसऱ्या दिवशी ते सकाळी उशिरापर्यत बाहेर आलेच नाही. त्यानंतर त्यांच्या बॉडीगार्डनं बराचवेळ दरवाजा वाजवला. पण कुणीच दार उघडेना. तेवढयात खिडकीतून त्यानं पंख्यावर जे दृश्य पाहिले त्यामुळे तो हादरुन गेला. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून नितीन देसाई यांना लटकलेल्या अवस्थेतून खाली जमिनीवर ठेवत पोलिसांनी तातडीनं माहिती दिली.
देसाई हे ५७ वर्षांचे होते. येत्या ९ ऑगस्ट रोजी ते आपला ५८ वा जन्मदिवस साजरा करणार होते. मात्र जन्मदिवसापूर्वीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडमधील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी केवळ हिंदीच नाहीतर मराठी चित्रपटांसाठी देखील वेगवेगळ्या चित्रपटांचे सेट्स उभारले होते. त्यांना बेस्ट आर्ट डिरेक्टर म्हणून चारवेळा नॅशनल अॅवॉर्डनं सन्मानित करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.