Nitin Chandrakant Desai Death : बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांना आपल्या सर्जनशीलतेनं वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या प्रतिभावंत नितीन चंद्रकांत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी आपली जीवनयात्रेला पूर्णविराम दिला. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्यानं साऱ्या चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. त्यांचे जाणे चाहत्यांना, मोठमोठ्या सेलिब्रेटींना चटका लावून जाणारे होते.
नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. एनडी स्टुडिओमध्येच हा विधी पार पडला आहे. यावेळी रायगड पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. देसाई यांचा मुलगा कांत याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
यावेळी हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार आमीर खान, दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता मुकेश ऋषी, भाजपचे नेते विनोद तावडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार सुबोध भावे, मानसी नाईक, आदेश बांदेकर आदींसह देसाई यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार, चाहते उपस्थित होते.
देसाई यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी जे. जे. रुग्णालय मुंबई येथे झाल्यानंतर देसाई यांच्या अंतिम इच्छेनुसार अंत्यसंस्कार एन. डी. स्टुडिओत करण्यात आले. स्टुडिओत ‘जोधा-अकबर’साठी तयार करण्यात आलेल्या दरबारात देसाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. देसाई यांनी आत्महत्येचा निर्णय घेणे यामागे नेमके काय कारण होते याचा शोध पोलीस घेत आहे.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
देसाई यांनी स्टुडिओसाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची रक्कम शंभर कोटींहून अधिक होती. दुसरीकडे स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देण्यास विलंब होत होता. काही महिन्यांपूर्वी एनडी स्टुडिओमध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले होते. अशी चर्चा होती.
देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही व्हॉइस क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. त्यामधून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या चार पाच अधिकाऱ्यांची नावं त्यांनी यात घेतली आहेत.
एनडी स्टुडिओमध्ये पार पडलेल्या अंत्यसंस्काराच्या विधीला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात....
हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, प्रेम रतन धन पायो, चक दे इंडिया, हरिश्चंद्राची फॅक्टरी, राजू चाचा, अजिंठा, दिलजले, गॉड तुस्सी ग्रेट हो, रंगीला, इश्क, वन्स अपॉन टाईम इन मुंबई, द लिजंड ऑफ भगतसिंग, फर्जंद, बालगंधर्व, मिशन कश्मिर, प्यार तो होना ही था यासारख्या अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या देसाई यांच्या जाण्यानं भारतीय चित्रपट विश्वाची मोठी हानी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.