Nitin Desai Death art director nitin desai made stage for Uddhav Thackeray Oath Ceremony  
मनोरंजन

Nitin Desai News : नितीन देसाईंचं ठाकरे कनेक्शन; अवघ्या २० तासात अविस्मरणीय बनवला 'तो' खास क्षण

रोहित कणसे

Nitin Desai Death : चित्रपट क्षेत्रातील प्रख्यात कला दिग्दर्शक, निर्माता नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जत येथील स्टुडिओत त्यांनी आत्महत्या केल्याने चित्रपट क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सर्व स्तरातील दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. यादरम्यान देसाई यांच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यांनी उभारलेले भव्य-दिव्य सेट्सची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

सेट उभारताना त्यामध्ये दिसणारी भव्य-दिव्यता ही नितीन देसाई यांच्या कामाची खासियत मानली जाते. दरम्यान काही वर्षांपूर्वी अवघ्या २० तासात देसाईंनी उद्धव ठाकरेंसाठी एक सेट उभा केला होता. या सेटची सर्वत्र खूप चर्चा देखील झाली होती.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी शिवाजी पार्क येथे भव्य व्यासपीठ उभं करण्यात आलं. हा सोहळा निर्वीघ्न संपन्न झाला. मात्र त्यानंतर सगळीकडं शिवाजी पार्कात उभारण्यात आलेल्या त्या व्यासपीठाचीच चर्चा झाली. त्या व्यासपीठावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हाच या शपथविधी सोहळ्याचं आकर्षण ठरला.

पण यातही महत्वाची बाब म्हणजे हे व्यासपीठ अवघ्या २० तासांत उभं करण्यात आलं होतं. अर्थात हे स्टेज प्रख्यात आर्ट डायरेक्टर नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभं केलं होतं.

कोण आहेत नितीन देसाई?

चित्रपट पाहण्याची आवड असणारे सर्वजण देसाई यांना नक्कीच ओळखतात. बॉलिवुडमधील लगान, देवदास, जोधा अकबर अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमधील भव्य सेट त्यांनीच डिझाईन केले आहेत. नितीन देसाईंना यासाठी अनेक मोठ पुरस्कार देखील मिळाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास व्यासपीठ डिझाईन करण्याबाबत बोलताना देसाई यांनी सांगितलं होतं की, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी सेट डिझाईन करायचा होता. तेव्हा आमची बैठक झाली. त्यानंतर त्यांच्या समोर बसूनच मी माझ्या ऑफिसात संपूर्ण मॉडल तयार केलं. ते मॉडेल त्यांना आवडलं. त्यानंतर आम्ही त्यावर काम सुरू केलं. देसाई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या सेटचा व्हिडीओ देखील शेअर केला होता.

देसाईंनी माध्यमांना बोलताना या संपुर्ण प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. व्यासपीठाचं मॉडेल तयार झाल्यानंतर आमच्याकडे संपूर्ण तयारीसाठी २० तासांचा वेळ होता. उद्धव ठाकरेंसाठी हा खूप मोठा क्षण (मुख्यमंत्री शपथविधी) होता, त्यामुळे आमच्यात काम करण्याबद्दल खूप उत्साह होता.

उद्धव ठाकरे हे देखील कलाकार आहेत.तसेच बाळासाबेब ठाकरे यांच्यासाठी देखील नेहमीच काम करण्याची संधी मला मिळाल्याचेही नितीन देसाई म्हणाले होते.सेटवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्याबद्दल बोलताना नितीन देसाई म्हणाले होते की, सत्तेत कोणीही आलं तरी ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतोच.

त्यांचं नाव घेऊनच राज्याला पुढे नेलं पाहिजे. उद्धवजींना छत्रपती शिवरायांबद्दल खूप आपुलकी आहे आणि प्रत्येक गोष्ट त्यांचे नाव घेऊनच करणे पसंत करतात. ही गोष्ट पाहून ही योजना आखण्यात आली असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT