Nivedita Ashok Saraf Instagram
मनोरंजन

निवेदिता यांनी सांगितली अशोक सराफ यांच्या नावामागची रंजक कहाणी

पाहा त्यांचा हा खास फोटो

स्वाती वेमूल

दमदार अभिनयाने आणि विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते अशोक सराफ Ashok Saraf यांचा आज वाढदिवस. इंडस्ट्रीमध्ये त्यांना 'अशोक मामा' म्हणूनच ओळखलं जातं. पण त्यांच्या नावामागची रंजक कहाणी तुम्हाला माहित आहे का? खुद्द त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ Nivedita Saraf यांनीच एकदा सोशल मीडियावर पोस्ट लिहित अशोक सराफ यांच्या नावामागील कहाणी सांगितली होती. त्याचसोबत निवेदिता यांनी एक फोटोसुद्धा पोस्ट केला होता. या फोटोमध्ये अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत अशोक सराफ पाहायला मिळत आहेत. (nivedita joshi saraf tells story behind the name of ashok saraf see this special pic of him)

'गुरु शिष्य.. मोठी बहीण विजया ही अशोक कुमारांची खूप मोठी चाहती. त्यांच्या अभिनयानं ती खूप भारावून गेली होती. धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टानं त्याचं नाव अशोककुमार ठेवायला आईला भाग पाडलं. ईश्वरानेही तथास्तु म्हटलं. अशोककुमार सराफचाच पुढे झाला अशोक सराफ. चतुरस्त्र अभिनेता आजही तितक्याच ताकदीने, उत्साहाने ठामपणे उभा आहे आणि अशोककुमारांना गुरुस्थानी मानतो आहे', असं निवेदिता यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

वाढदिवसानिमित्त निवेदिता यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अशोक सराफ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा अशोक, पूर्वजन्मात मी नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असणार, म्हणूनच या जन्मात तुम्ही मला पती म्हणून भेटला आहात. तुम्ही माझी ताकद, माझे गुरू, माझा मित्र, माझे पालक सर्वकाही आहात. एक उत्तम अभिनेत्यासोबतच तुम्ही एक उत्तम माणूससुद्धा आहात', अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

विनोदाचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे अशोक मामा हे लहानांपासून अगदी थोरांपर्यंत सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. गेल्या वर्षी त्यांचा 'प्रवास' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT