Niyat Movie Vidya Balan Bollywood Actress Anu Menon esakal
मनोरंजन

Niyat Movie Review : कमजोर कथेमुळे निराश करणारा चित्रपट!

हिंदी चित्रपटसृष्टीत काही नायिका अशा आहेत की त्यांनी स्वतःच्या हिमतीवर चित्रपट यशस्वी करून दाखविले आहेत.

संतोष भिंगार्डे

Niyat Movie Vidya Balan Bollywood Actress Anu Menon : हिंदी चित्रपटसृष्टीत काही नायिका अशा आहेत की त्यांनी स्वतःच्या हिमतीवर चित्रपट यशस्वी करून दाखविले आहेत. त्यापैकीच एक आघाडीची नायिका म्हणजे विद्या बालन. विद्याने स्वतःच्या हिमतीवर चित्रपट यशस्वी करून दाखविले आहेत. तिच्या काही चित्रपटांनी हंड्रेड करोड क्लबमध्ये स्थान मिळविले आहे.

आता चार वर्षांनी विद्या बालनचा नीयत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री विद्या बालन, दिग्दर्शक अनु मेनन आणि निर्माते विक्रम मल्होत्रा हे त्रिकूट या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले आहे. यापूर्वी या त्रिकुटाने शकुंतला देवीसारखा यशस्वी चित्रपट दिला होता. आता प्रदर्शित झालेल्या नीयत या चित्रपटात आशिष कपूर (राम कपूर) या उद्योगपतीची कहाणी मांडण्यात आली आहे. या उद्योगपतीचा वाढदिवस असतो.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

आपल्या या वाढदिवसाचे सेलिब्रेशन तो स्कॉटलंड येथील समुद्र किनाऱ्यावरील एका व्हिलामध्ये आयोजित करतो. त्याकरिता आपल्या सगळ्या मित्रमंडळींना या सेलिब्रेशन निमंत्रण देतो. त्याची जवळची मित्रमंडळी एकेक करून या सेलिब्रेशन पार्टीत सहभागी होते. त्यातच सीबीआय अधिकारी असलेली मीरा राव (विद्या बालन) हीदेखील त्या ठिकाणी पोहोचते.

त्या पार्टीमध्ये आशिष कपूर आपला एक निर्णय जाहीर करतात. त्यांचा तो निर्णय ऐकून उपस्थित सगळी मंडळी अचंबित होते. त्यांची एकमेकांमध्ये चर्चा सुरू होते आणि अचानक आशिष कपूर यांचा खून होतो. त्यानंतर सीबीआय अधिकारी असलेली मीरा राव उपस्थित एकेकाची चौकशी करते. मग पुढे कशा व कोणत्या घडामोडी घडतात याकरिता हा चित्रपट पाहावा लागेल.

अभिनेत्री विद्या बालनचा मिशन मंगल हा चित्रपट सन २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर आला होता. त्यानंतर आता तिचा हा चित्रपट तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर आला आहे. मध्यंतरी तिचे शकुंतला देवी वगैरे चित्रपट आलेले होते. परंतु ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते. त्यामुळे तिच्या आता चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या नीयत या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती. मात्र हा चित्रपट फारसा परिणामकारक झाला आहे असे म्हणता येणार नाही.

मुळात चित्रपटाच्या कथेमध्ये फारसा दम नाही. त्यामुळे निराश व्हायला होते. दिग्दर्शिका अनू मेननने शकुंतला देवी सारखा चांगला चित्रपट केला होता. परंतु मर्डर मिस्ट्रीसारखा विषय तिने पहिल्यांदाच हाताळला आहे. परंतु चित्रपटाची कथा कमजोर आहे. त्यामुळे चित्रपटाच्या पटकथेमध्ये फारसे टर्न आणि ट्विस्ट नाहीत. विद्या बालन ही अनुभवी आणि जाणकार कलाकार आहे आणि तिने नेहमीप्रमाणेच सहजसुंदर अभिनय केला आहे. तिने काहीसा वेगळा लूक आणि वेगळा प्रयत्न आपल्या व्यक्तिरेखेद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ती यशस्वी झाली आहे.

राहुल बोस, नीरज काबी, दीपानिता शर्मा, शहाना गोस्वामी, शशांक अरोरा, अमृता पुरी या सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम केल्या आहेत. प्रसिद्ध यू ट्यूबर प्राजक्ता कोळीनेदेखील या चित्रपटात अभिनय केला आहे. तिचे कामही उत्तम झाले आहे. अभिनेत्री शेफाली शहाची छोटीशी झलक चित्रपटाचे एक आकर्षण आहे. अभिनेते राम कपूर यांनी उद्योजक आशिष कपूरच्या भूमिकेत आपली छाप उत्तम पाडलेली आहे.

'एक था टायगर', 'धूम 3', 'बजरंगी भाईजान' अशा अनेक चित्रपटांमध्ये हिट गाणी लिहिणाऱ्या कौसर मुनीर यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. परंतु हे संवाद फारसे प्रभावी झालेले नाहीत. चित्रपटांचे पार्श्वसंगीतदेखील निराश करणारे झाले आहे. संकलनाच्या बाबतील संकलक अॅडम माॅसने उत्तम कामगिरी केली आहे. सिनेमॅटोग्राफरने काही दृश्ये छान टिपली आहेत. मात्र कमजोर कथेमुळे चित्रपट निराश करणारा झाला आहे.

दोन स्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT