Norway Bollywood Film Festival 2023 Aarya Daughter Of Bharat : पुण्याचे नितीन भास्कर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आर्या – डॉटर ऑफ भारत’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन नॉर्वेच्या बॉलिवूड फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. हा चित्रपट नॉर्वेच्या बॉलिवूड फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणारा एकमेव मराठी चित्रपट आहे हे विशेष. येत्या ८ ते १४ सप्टेंबर, २०२३ दरम्यान या चित्रपटाचे प्रदर्शन नॉर्वेच्या बॉलिवूड फेस्टिव्हलमध्ये होईल. एसएस फिल्म फाउंडेशनचे शरद पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
आधुनिक शहरी इंडिया आणि पारंपारिक ग्रामीण भारत यांचे दर्शन आपल्याला आर्या या चित्रपटात होते. आर्या व तिच्या पालकांची गोष्ट चित्रपटात चितारण्यात आली असून संस्कृती, तंत्रज्ञान आणि विचारधारा यांमध्ये असलेला फरक अधोरेखित करण्यात आला आहे. या सर्वांमधून आर्या कशा प्रकारे बंधने झुगारत स्वत:च्या अटींवर आपल्या स्वप्नांना गवसणी घालते हा प्रवास दाखविण्यात आले आहे.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपलाकडे अत्याधुनिक इंडिया आणि ग्रामीण भारत हे भाग आहेत असे मला कायमच जाणवायचं. याच विचारांवर ‘आर्या’ हा चित्रपट बेतलेला आहे. जगाने माझ्या दृष्टीतून आणि विचाराने या विषयाकडे पहावे अशी भावना दिग्दर्शक नितीन भास्कर यांनी व्यक्त केली.
हा चित्रपट आम्ही केवळ नॉर्वेच्या बॉलीवूड चित्रपट महोत्सवासाठी पाठविला होता. त्यामुळे या महोत्सवात तो दाखविला जाणे ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. या महोत्सवात निवड होण्यासाठी अनेकदा प्रयत्न करावे लागतात, मात्र पहिल्या प्रयत्नांमध्ये आर्या चित्रपटाची निवड होणे आमचा निर्धार वाढविणारी बाब असल्याचे भास्कर यांनी नमूद केले.
आर्या या चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणारा एकमेव मराठी चित्रपट असल्याने आम्ही या महोत्सवामध्ये मराठी चित्रपट सृष्टीचे प्रतिनिधित्व करीत आहोत याचा आम्हाला आनंद आहे असे, निर्माते शरद पाटील यांनी सांगितले. यामुळे कलात्मक चित्रपट तयार करण्यासाठी आम्हाला आणखी पाठबळ मिळेल असे पाटील म्हणाले.
चित्रपटाची कथा, संवाद आणि गीत लेखन – डॉ प्रकाश परिनकर, पटकथा लेखन - डॉ. प्रकाश परिनकर, श्रीकांत भिडे, मुख्य सहाय्यक दिग्दर्शक - सागर राठोड, प्रॉडक्शन मॅनेजर - अमोल लांडगे, कला दिग्दर्शक - नितीन बोरकर, कार्यकारी निर्माता - विजयकुमार मगरे, नेपथ्य- विशाखा शिंदे, ड्रेस - योगिता पाटील, चित्रपट संपादन – स्मिता फडके, डीआय कलरिस्ट – विनोद राजे, संगीत - रोहित नागभिडे; व्हीएफएक्स पर्यवेक्षक - आत्माराम सावंत, सिद्धार्थ तोरी, साउंड डिझाईन आणि मिक्सिंग इंजिनिअर - धनंजय साठे, सिनेमॅटोग्राफी- एस समीर, निर्माते शरद पाटील, अंजली पाटील, दिग्दर्शक – नितीन भास्कर यांनी केले आहे.
नॉर्वेच्या बॉलीवूड महोत्सवाबद्दल –
नॉर्वे बॉलीवूड महोत्सव हा २००३ पासून नॉर्वे येथे संपन्न होणारा सर्वांत मोठा भारतीय चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. भारत आणि नॉर्वे यांमधील द्विदेशीय सांस्कृतिक संबंध वाढविणे आणि जपणे यासोबतच भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे हा या मागील उद्देश आहे. महोत्सवात विविध भारतीय चित्रपट प्रदर्शित केले जातात. भारतीय चित्रपटसृष्टी आणि संस्कृती यांच्या संस्कृतीचे दर्शन नॉर्वेतील चित्रपट रसिकांना घडविणे, उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शक व निर्मात्यांना प्रोत्साहन देणे हा देखील महोत्सव आयोजनामागील हेतू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.