Not Rishab Shetty, Puneeth Rajkumar Was Supposed To Star In 'Kantara'; Why he rejected this role  sakal
मनोरंजन

Kantara: ऋषभ शेट्टी ऐवजी 'हा' अभिनेता साकारणार होता कांतारामधील शिवा.. पण..

'कांतारा'मधील ऋषभ शेट्टीच्या अभिनायाचं चांगलंच कौतुक होतंय पण त्या भूमिकेसाठी दुसऱ्याच अभिनेत्याची निवड झाली होती.

नीलेश अडसूळ

Kantara: Kantara: 'कांतारा' (kantara) हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास एक महिना उलटला तरीही अद्याप या चित्रकापटची क्रेझ कमी झालेली नाही. प्रेक्षक अजूनही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहत आहेत. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर सुसाट कमाई करत केली आहे. जवळपास 200 कोटींचा टप्पा याचित्रपटाने पार केला आहे. या सिनेमातील दमदार अभिनयामुळे त्यातील प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता ऋषभ शेट्टी सध्या भलताच चर्चेत आहे. पण या चित्रपटातील प्रमुख भूमिके विषयी ऋषभ शेट्टी त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

(Not Rishab Shetty, Puneeth Rajkumar Was Supposed To Star In 'Kantara'; Why he rejected this role )

'कांतारा' (Kantara) या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांनीच केलं असून प्रमुख भूमिकेतही तेच आहेत. या चित्रपटतील ऋषभ शेट्टी यांच्या अभिनायाचं अनेकांनी कौतुक केलं. पण ऋषभ शेट्टीच्या ऐवजी एक दुसराच अभिनेता ही भूमिका करणार होता, असे ऋषभ शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितले. दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) हे या चित्रपटात 'शिवा' ही भूमिका साकारणार होते, असे शेट्टी म्हणाले.

ते म्हणाले, 'मला शिवा ही भूमिका साकारायची होती पण या चित्रपटाची निर्मिती करण्याआधी मी या भूमिकेची ऑफर अभिनेता पुनीत राजकुमार यांना दिली. त्यांना मी चित्रपटाची कथा देखील ऐकवली होती. पण ते दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी मला सांगितले की, हा चित्रपट तुम्ही माझ्याशिवाय करा कारण माझी वाट तुम्ही पाहिली तर यावर्षी तुम्ही हा चित्रपट करु शकणार नाही.' 

पुढे ते म्हणाले, 'पुनीत राजकुमार यांचे निधन होण्याच्या दोन दिवस आधी 'बजरंगी 2' चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये ते मला भेटले होते. यावेळी त्यांनी मला कांताराबद्दल विचारले, आणि मी त्यांना शूटचे काही फोटोही दाखवले, त्यांनी कौतुकही केलं. शिवाय त्यांना हा चित्रपट पहायचाच होता.' पण त्या पुनीत यांचे निधन झाले. अभिनेते पुनीत राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या 46 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT