Nushrratt Bharuccha Israel eSakal
मनोरंजन

Nushrratt Bharuccha : इस्राइलमध्ये युद्धाच्या भडक्यात अडकली नुसरत भरुचा; संपर्क होत नसल्याची टीमची माहिती

Israel War : शनिवारी हमास दहशतवादी संघटनेने इस्राइलवर हल्ला केला होता, त्यानंतर तिथे युद्ध सुरू झालं आहे.

Sudesh

शनिवारी गाझा पट्ट्यातून इस्राइलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा करत प्रत्युत्तर दिले. या सगळ्यात कित्येक भारतीय नागरिक इस्राइलमध्ये अडकले असून, त्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येतंय.

नुसरतच्या टीममधील एका सदस्याने याबाबत माहिती दिली आहे. नुसरत हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी इस्राइलला गेली होती. मात्र, आता तिच्याशी आपला संपर्क होत नसल्याचं या सदस्याने मीडियाशी बोलताना सांगितले. शनिवारी दुपारी 12.30च्या सुमारास तिच्याशी अखेरचा संपर्क झाला होता. ती त्यावेळी एका बेसमेंटमध्ये सुरक्षित होती, असंही सांगण्यात आलं आहे.

पॅलेस्टाईन-इस्राइल युद्ध

शनिवारी पहाटे गाझा पट्ट्यातून इस्राइलवर तब्बल 5,000 क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. तसंच हमास संघटनेच्या दहशतवाद्यांनी इस्राइलमध्ये शिरत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यास सुरुवात केली. यानंतर इस्राइलने ऑपरेशन आयर्न स्वॉर्डची घोषणा करत गाझा पट्टा आणि हमासवर हल्ला सुरू केला.

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन-इस्राइल संघर्ष पुन्हा पेटला आहे. यानंतर हमासने रविवारी सकाळी पुन्हा इस्राइलवर 150 हून अधिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. आतापर्यंत इस्राइलच्या 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT