Odia film producer Sanjay aka Tutu Nayak arrested for assaulting woman journalist  SAKAL
मनोरंजन

Sanjay aka Tutu Nayak: महिला पत्रकाराला मारहाण आणि गैरवर्तन, प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला अटक

महिला पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी निर्मात्याला अटक करण्यात आलीय

Devendra Jadhav

Sanjay aka Tutu Nayak Arrested News: ओडियामधील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने महिला पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेप्रकरणी भुवनेश्वरमध्ये पोलिसांनी ओडिया चित्रपट निर्माता संजय उर्फ ​​टुटू नायक याला अटक केली.

महिला पत्रकार देबस्मिता राऊत यांनी खारावेला नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या FIR नंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

महिला पत्रकाराने चित्रपट निर्मात्यावर केले गंभीर आरोप

पत्रकार देबस्मिता राऊत यांनी आरोप केला की, माझ्या हातातून माझा मायक्रोफोन आणि मोबाईल खाली पडला. सामान उचलण्यासाठी मी खाली वाकले असता नायक यांनी माझ्या पाठीवर जोरदार गुद्दा मारला. त्याने असे का केले हे मला माहीत नाही.

पोलिसांनी टुटूवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354, 323, 341 आणि 294 अंतर्गत गुन्हा दाखल केला. स्थानिक न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

संजय नायक यांनी महिला पत्रकाराशी गैरवर्तन केले

शुक्रवारी एका ओडिया चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी देबास्मिता सिनेमागृहात असताना संजय नायकने तिला कानाखाली मारली आणि तिच्यासोबत गैरवर्तन केले. संजयने हे नेमकं का केलं? त्याचा आणि देबस्मिता यांचा काही जुना वाद होता का? हे मात्र अद्याप कळू शकलं नाहीय.

आदल्या दिवशी नायकला खारावेला नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तेथे त्याची चौकशी करण्यात आली. (Latest Marathi News)

संजय नायक यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली

शनिवारी सायंकाळी आरोपी संजय नायकला न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्याला १४ दिवसांसाठी झारपारा कारागृहात पाठवण्यात आले आहे.

कथित हल्ल्याच्या घटनेनंतर, ओडिशा वुमन इन मीडिया या महिला पत्रकार मंचाच्या सदस्यांनीही पोलिस उपायुक्त (डीसीपी), भुवनेश्वर यांच्याकडे तक्रार केली होती आणि या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

महिला आयोगानेही गुन्हा नोंदवला

दरम्यान, याप्रकरणी राज्य महिला आयोगानेही स्वत:हून गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी महिला आयोगाने पोलिसांकडून १५ दिवसांत केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ती भिंत तोडणारच.. ५०% आरक्षणावरुन राहुल गांधींचा घणाघात, सविधान सन्मान संमेलनात केला हल्लाबोल

ते पुन्हा आले! US Presidential Election मध्ये शानदार विजय, पहिल्याच भाषणात Donald Trump काय म्हणाले?

भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा तिकीट का देता? नाना पाटेकरांचा थेट सवाल; फडणवीसांच्या उत्तराने उंचावतील भुवया

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, आता भारतीय इंजिनीअर्सच्या नोकऱ्या जाणार का?

Ranji Trophy 2024: ६०००+ धावा अन् ४००+ विकेट्स; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय, पण टीम इंडियात संधी नाही

SCROLL FOR NEXT