Amid of Akshay kumars OMG2 controversy : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओह माय गॉडचा दुसरा पार्ट आता ऑगस्टमध्ये प्रदर्शित होतो आहे. त्याच्या व्हायरल झालेल्य टीझर आणि गाण्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात काही नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे अक्षय कुमारच्या या चित्रपटावरुन वादाला सुरुवात केली आहे.
ओएमजीच्या मेकर्सनं देखील सेन्सॉर बोर्डावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर बोर्डानं पूर्वीच प्रौढांसाठी असे प्रमाणपत्र दिले आहेत तर आणखी कट्स करायला सांगण्याची गरजच काय आहे असा परखड प्रश्न त्यांनी विचारले आहेत. त्यामुळे येत्या काळात ओमएमजीची अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याची भीती चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
बऱ्याच दिवसांपासून चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याची अक्षयच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी आणि यावर्षी अक्षयचे जितके चित्रपट प्रदर्शित झाले ते फ्लॉप झाल्याचे दिसून आले आहे. त्यात त्याच्या अलीकडे प्रदर्शित झालेल्या रामसेतू नावाच्या चित्रपटाचाही समावेश आहे. पृथ्वीराज चौहान, बच्चन पांडे या चित्रपटांनी देखील निराशा केली. तर बेल बॉटमवरुन तो खूपच ट्रोलही झाला होता. ओएमजीच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
OMG2 मध्ये अक्षयसोबत प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय आणि पंकज दुसऱ्यांदा एकत्रित काम करणार आहेत. यापूर्वी ते बच्चन पांडेमध्ये दिसले होते. OMG2 वरुन देखील सोशल मीडियावर वेगळ्या चर्चेला उधाण आले होते. त्यावरुन वादही झाला होता. भगवान शंकर यांचे चित्रिकरण, त्यांचे तांडव आणि रेल्वे स्टेशनवरील तो प्रसंग यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले होते.
दुसरीकडे सेन्सॉर बोर्डानं OMG2 ला फक्त प्रौढांसाठी असे प्रमाणपत्र दिले आहे. त्यात दिग्दर्शकानं बोर्डावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अमित राय यांनी OMG २ चे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी बोर्डाला खडे बोल सुनावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर बोर्डानं आम्हाला प्रौढांसाठी असे सर्टिफिकेट दिले आहे तर चित्रपटात आणखी कट्स का सांगितले गेले आहे कळत नाही. अशा शब्दांत राय यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे.
OMG चा पहिला भाग उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केला होता. OMG मध्ये २२ कट्स सुचवण्यात आले आहेत. याविषयी उमेश यांनी सांगितले की, या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ते खूपच संवेदनशील आहेत. मी त्यांच्या पूर्ण टीमचे कौतूकही करतो. त्यांनी खूप मेहनतीनं ही फिल्म तयार केली आहे. मी अजून काही ती फिल्म पाहिलेली नाही. त्यामुळे त्यावर बोलणं उचित ठरणार नाही. असेही उमेश यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.