OMG 2 Akshay Kumar Movie CBFC A Certificate  esakal
मनोरंजन

OMG 2: ओह माय गॉड! सेन्सॉर बोर्डानं दिलं 'ए सर्टिफिकेट'? 'या' अटी पाळव्याच लागतील!

बोर्डानं या चित्रपटाला अ प्रमाणपत्र दिले आहे. प्रदर्शनापूर्वी ओह माय गॉड २ चे दिग्दर्शक प्रमाणपत्राच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

OMG 2 CBFC Censor Board gives A certificate : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ओह माय गॉडचा दुसरा पार्ट हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची टक्कर गदर २ सोबत होणार आहे. मात्र यासगळ्यात हा चित्रपट आता सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निर्मात्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ओह माय गॉडचा पहिला पार्ट ज्यावेळी प्रदर्शित झाला होता त्यावेळी त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यातील संवाद, कलाकारांचा अभिनय, गाणी हे सारं प्रेक्षकांना कमालीचे आवडले होते. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. त्यानं प्रचंड कमाईही केली होती. आता अशी बातमी समोर आली आहे की, सीबीएफसी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं निर्मात्यांना मोठा धक्का दिला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

बोर्डानं या चित्रपटाला अ प्रमाणपत्र दिले आहे. प्रदर्शनापूर्वी ओह माय गॉड २ चे दिग्दर्शक प्रमाणपत्राच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे बोर्डाला अक्षय कुमारचा हा चित्रपट वादग्रस्त वाटत असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे की काय बोर्डानं दिग्दर्शकाला या चित्रपटामध्ये आणखी २० कट्स सुचवले आहेत. याविषयीचे अधिकृत माहिती देणारे वृत्त इ टाईम्सनं दिले आहे.

बोर्डानं २० कट्स सांगितले असून त्याबाबतची नोटीस मात्र अजून निर्मात्यांना दिलेली नाही. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बोर्डाच्या समितीनं हा चित्रपट पाहिला असून त्यात त्यांनी काही बदलही सुचवले आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची फायनल रिलीज डेट अक्षय ठरवणार आहे. अक्षय सध्या भारतात नसून तो शुटींगच्या निमित्तानं परदेशात आहे. त्याच्याकडून यासगळ्या विषयावर कोणतेही अधिकृतपणे स्टेटमेंट आलेले नाही.

एखाद्या चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळणे म्हणजे लहान मुलं आणि कुटूंबासमवेत हा चित्रपट पाहता येणार नाही. यासगळयाचा मोठा फटका चित्रपट निर्मात्यांना बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी देखील अक्षयच्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाचा फटका बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT