omg 2 teaser out now starring akshay kumar pankaj tripathi yami gautam release on 11 august  SAKAL
मनोरंजन

OMG 2 Teaser: आता नास्तिक नाय तर आस्तिक भक्ताची कहाणी! OMG 2 चा टिझर पाहून अंगावर येईल शहारा

अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड 2' चा टीझर आज रिलीज झाला आहे.

Devendra Jadhav

OMG 2 Teaser News: अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड 2' चा टीझर आज रिलीज झाला आहे.

टीझर खूपच सुंदर झालाय. हे आस्तिक आणि नास्तिक, देव आणि श्रद्धा या गोष्टींवर टीझर भाष्य करतो.

(omg 2 teaser out now starring akshay kumar pankaj tripathi yami gautam release on 11 august)

टीझरमध्ये काय?

टीझरमध्ये असं दिसतं, पंकज त्रिपाठी हा आस्तिक शंकराचा निस्सीम भक्त. त्याच्यावर एक संकट आलेलं दिसतंय. अशातच एक मुलगा ट्रेनखाली येऊन आत्महत्या करताना दिसतोय. कुटूंबावर आलेलं संकट परतवुन लावण्यासाठी पंकज त्रिपाठी शंकराची आराधना करतात.

अशातच भगवान शंकर म्हणजेच अक्षय कुमारची एन्ट्री झालेली दिसते. भगवान शंकराच्या रुपात अक्षय कुमार पंकज त्रिपाठी सोबत राहून त्याच्यावरचं संकट कसं दूर करणार याची कहाणी OMG 2 मध्ये दिसणार आहे.

अक्षय कुमारचा लुक:

अक्षय कुमार भगवान शंकराच्या रुपात एकदम सुंदर दिसतोय. अक्षय कुमारला चांगलं प्रेझेन्ट करण्यात आलंय. भगवान शंकराच्या रुपात अक्षय मोठ्या जटा, कपाळावर भस्म अशा लुकमध्ये दिसतोय. अक्षयचा वावर विलक्षण आहे.

रेल्वे रुळाच्या बाजुला पाण्याने अभिषेक, याशिवाय नदीत स्नान अशा अनेक गोष्टींमुळे अक्षय कुमार खुप छान दिसतोय. OMG च्या पहिल्या भागात अक्षय कृष्णाच्या रुपात दिसला होता.

त्यावेळी कृष्णाने नास्तिकाची मदत केली होती. OMG 2 मध्ये अक्षय भगवान शंकराच्या रुपात नास्तिकाची मदत करताना दिसणार आहे.

 अक्षय कुमार बद्दल बोलायचं झाले तर गेले काही दिवस त्याच्यासाठी काही खास चांगले ठरलेले नाहीत. त्याने एकामागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. गेल्या एका वर्षात अक्षयने थिएटरमध्ये 5 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी त्यानंतर बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, कठपुतली, राम सेतू आणि त्यानंतर इम्रार हाश्मीसोबतचा सेल्फी हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकले नाहीत.

त्यामुळे आता OMG2 हा चित्रपट अक्षयच्या फ्लॉप चित्रपटांवर फुलस्टॉप लावेल का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सिनेमात यामी गौतम वकीलाच्या भुमिकेत दिसणार आहे. ११ ऑगस्टला OMG 2 रिलीज होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT