Nope sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन- सूचक भयाविष्कार

पीलच्या चित्रपटांमध्ये अमेरिकेतील वंशद्वेषाच्या इतिहासाला कायम स्थान राहिलेले आहे

अक्षय शेलार shelar.a.b.mrp4765@gmail.com

लेखक-दिग्दर्शक जॉर्डन पीलच्या चित्रपटांमध्ये अमेरिकेतील वंशद्वेषाच्या इतिहासाला कायम स्थान राहिलेले आहे. ‘नोप’मध्ये वर्णाचा कंगोरा अस्तित्वात असला, तरी चित्रपटातील टीकेचा रोख सनसनाटी दृष्टिकोन व प्रसिद्धीच्या अट्टहासाकडे आहे. स्वतःचा वर्चस्ववादी दृष्टिकोन कायम राखत अनेकविध गोष्टींवर नियंत्रण राखण्याची महत्त्वाकांक्षा माणसाने कायमच बाळगलेली आहे. अतर्क्य व गूढ गोष्टी नियंत्रित करू पाहण्याचे निष्फळ प्रयत्न ‘नोप’मधील मध्यवर्ती संकल्पनांपैकी एक आहेत.

कॅमेऱ्यावर चित्रित केला गेलेला पहिला मनुष्य हा कृष्णवर्णीय होता, असे सांगत चित्रपटव्यवसायातील आपल्या सांस्कृतिक वारश्याचे संदर्भ देणारे एक कृष्णवर्णीय बहीण-भाऊ ‘नोप’मधील मुख्य पात्रांपैकी एक होत. ओटिस हेवुड ज्यू. ऊर्फ ओजे (डॅनिअल कलुया) आणि एम (किकी पामर) यांच्या रान्चवर काही गूढ घडामोडी घडायला सुरूवात झालेली असते. त्यामागील कारणांचा शोध घेत असताना एका ‘अनआइडेन्टिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट’ (युएफओ) सदृश्य रूपात त्याचे उत्तर गवसते. जगाला अशा उडत्या तबकड्या पाहण्यात असलेला रस पाहता यातून बरीच प्रसिद्धी व पैसे कमावता येतील,

असा एमचा कयास असतो. त्यासाठी या युएफओचे चित्रीकरण करण्याचे प्रयत्न चित्रपटाच्या पूर्वार्धात दिसतात. तर, उत्तरार्धात या प्रयत्नांचे निरनिराळे परिणाम घडायला सुरूवात होते. याखेरीज, चित्रपटाच्या प्रोलॉगमध्ये सिटकॉमच्या सेटवरील जे अनपेक्षित दृश्य दिसते, त्यातील रिकी पार्क (स्टीव्हन यन) हे पात्रही इथे महत्त्वाचे आहे. ओजे आणि एमच्या रान्चजवळच रिकी स्वतःच्या पूर्वायुष्यातील काही घटनांचा बाजार मांडून बसलेला असतो.

ओजे, एम आणि रिकी हे सारेच एकेकाळच्या प्रसिद्धीच्या संक्षिप्त झोताच्या जोरावर वर्तमानात तग धरुन जिवंत राहत आहेत. प्रसिद्धी व प्रदर्शनाची ही हौस चित्रपटाच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. वास्तविक पाहता अशी हौस चित्रपटातील पात्रांना धोक्याकडे घेऊन जात असतानाही ते त्याकडे आकर्षित होत राहतात व माघार घेताना दिसत नाहीत. एखाद्या अगम्य गोष्टीला आपण नियंत्रित करू शकतो हा म्हटले तर आत्मप्रौढी भावनेतून आलेला विचार, प्रदर्शनाची ओढ असलेला मानवी स्वभावाचा कंगोरा पीलला रंजक वाटतो. ‘गेट आऊट’ (२०१७) या पीलच्या पहिल्या चित्रपटाप्रमाणे ‘नोप’मधील भयही सूचक पद्धतीचे आहे.

ते केवळ जम्प स्केअर्सचा वापर करुन घाबरवणारे नसून, जरा अधिक गंभीर स्वरूपाचे, आशयाच्या व दृश्यांच्या हिकमतीवर भयचकित करणारे आहे. ही सूचकता स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘जॉज’ (१९७५) आणि एम. नाईट श्यामलन दिग्दर्शित ‘साइन्स’ (२००२) व ‘द हॅपनिंग’च्या (२००८) जवळ जाणारी आहे. ज्यात भयाचा उगम किंवा तीव्रतेचे स्वरूप गूढ आणि मोजता न येण्यासारखे असले तरी त्या अगम्यतेमधून भयाची भावना निर्माण होते. ‘जॉज’ किंवा हिचकॉकच्या ‘बर्ड्स’प्रमाणे (१९६३) निसर्गाने मानवावर केलेली ही मात असते. हेवुड्स रान्चवरील युएफओ ही डिजिटल साधनांवर चित्रित होऊ शकत

नसल्याने डिजिटल विरुद्ध ॲनालॉग हा जुना वाददेखील पीलच्या चित्रपटात येतो. चित्रपटांच्या जगात डिजिटल कॅमेरे व कॉम्प्युटर-जनरेटेड इमेजेसना मिळालेले अतिरेकी महत्त्व (काही प्रमाणात) पीलच्या टीकेच्या केंद्रस्थानी येते, असे म्हणता येते. जॉर्डन पीलच्या ‘गेट आऊट’प्रमाणे ‘नोप’मध्येही कॅमेऱ्यांमुळे कुठल्याही गोष्टीचे दस्ताऐवजीकरण करणे किती सोपे व सोईस्कर झाले आहे, हे पाहायला मिळते. ‘गेट आऊट’मध्ये कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांवरील द्वेषपूर्ण कारवायांचे दस्तावेजीकरण सहजशक्य होते,

तर ‘नोप’मध्ये यातील वर्णद्वेषाचा कंगोरा काहीसा सौम्य होतो. तरी एका विस्तृत दृष्टिकोनातून पाहिल्यास, कृष्णवर्णीय पात्रांवर असलेली धोक्याची टांगती तलवार ही वैश्विक स्तरावरील वंशद्वेषाचे द्योतक आहे. आणि हे सारे सूक्ष्म बारकावे बाजूला सारायचे झाले तरी, ‘नोप’ हा एक प्रचंड प्रभावी व खिळवून ठेवणारा भयपट आहेच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT