ऑन स्क्रीन sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन - हिंसक, पलायनवादी ऑल्टरनेट हिस्टरी

अमेरिकेतील नाझीधार्जिण्या लोकांनी तसेच अमेरिकन सरकारने पूर्वाश्रमीचे नाझी अधिकारी आणि हिटलर समर्थकांना आश्रय दिला,

अक्षय शेलार shelar.a.b.mrp4765@gmail.com

हिंसक कृतीचे प्रत्युत्तर हिंसक कृतीने देणे गरजेचे असते का, असा नैतिक प्रश्न मानवजातीला कायमच पडत असतो. बहुतांशी वेळा लोक ‘आँख के बदले आँख का सिद्धांत सारी दुनिया को अंधा कर देगा,’ असे म्हणत अहिंसेचा मार्ग स्वीकारतात, ज्यात तथ्यही आहे. मात्र, प्रत्येक घटनेकडे काळ्या-पांढऱ्याच्या मूलभूत स्वरूपात पाहता येणे शक्य नसते. कारण, आपल्यापुढील प्रश्न हे अधिक जटिल स्वरूपाचे आहेत. ‘हन्टर्स’ ही मालिका नाझी-जर्मनी आणि त्यानंतरच्या अमेरिकेच्या इतिहासाचे एक समांतर, काल्पनिक रूप समोर मांडत हेच काळ्या-पांढऱ्याची दुहेरी रचना तोडते.

अमेरिकेतील नाझीधार्जिण्या लोकांनी तसेच अमेरिकन सरकारने पूर्वाश्रमीचे नाझी अधिकारी आणि हिटलर समर्थकांना आश्रय दिला, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. अगदी अमेरिकेच्या चांद्रयान मोहिमेवर काम केलेल्या लोकांमध्येही काही नाझी समाविष्ट होते. एकोणिसशे साठ-सत्तरच्या दशकांत बहुतांशी अमेरिकन संस्थांमध्ये नाझी लोकांनी शिरकाव केला होता. ‘हन्टर्स’ याच कालखंडात घडते. अमेरिकेतील काही ज्यू लोक अमेरिकेत दडून बसलेल्या नाझी लोकांना शोधून त्यांचा नायनाट करीत आहेत, या संकल्पनेभोवती मालिका फिरते. क्वेंटिन टॅरेन्टिनोच्या ‘इनग्लोरिअस बास्टर्ड्स’मध्ये (२००९) जसे इतिहासातील काळ्या पानांचे पुनर्लेखन केले जाते, तसा ऑल्टरनेट हिस्टरीचा प्रकार इथे पाहायला मिळते.

काळ आहे १९७७चा. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या जोना हिडलबॉम (लोगन लर्मन) या तरुणाचा मायर ऑफरमन (अल पचिनो) या गूढ, श्रीमंत व्यक्तीशी संबंध येतो. ऑफरमन हा अमेरिकेत लपून बसलेल्या नाझी लोकांना शोधून मारण्याचे काम करत असतो. जोनादेखील त्याला सामील होतो नि विक्षिप्त व्यक्तिमत्त्वांनी साकारलेल्या एका टोळीसह इथल्या हिंसक कारवायांची सुरवात होते. मालिकेच्या नावात सूचित केलेले ‘हन्टर्स’ म्हणजे ऑफरमनच्या देखरेखीखाली कार्यरत असणारी ही टोळी!

‘हन्टर्स’ ही मालिका पात्रांच्या मनातील मोठ्या नैतिक पेचाच्या फंदात न पडता सरळ हिंसक मार्ग निवडणारी आहे. नैतिक द्वंद्वाला त्यात थोडेफार स्थान जरूर आहे, मात्र मुख्य हेतू हा ज्यू लोकांच्या हाती बदल्याचे साधन देत पाहणाऱ्याला पलायनवादी आनंद मिळवून देण्याचा आहे. प्रत्येक नाझी व्यक्तीला मारताना वापरलेले नवनवीन नि कल्पक मार्ग आणि हिंसेचा अतिशयोक्तीपूर्ण व विनोदी ढंगाने केलेला वापर पाहायला मिळतो.

‘हन्टर्स’च्या दृष्टिकोनाच्या अगदी विरुद्ध असा दृष्टिकोन असलेला एक माहितीपट इथे आठवतो. ‘द अकाऊन्टन्ट ऑफ ऑश्वित्झ’ (२०१८) या माहितीपटामध्ये ऑश्वित्झमधील नाझी छळछावणीमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यावर खटला चालवला जात असतानाचा घटनाक्रम समोर मांडलेला आहे. ज्यात शेवटी त्याची निर्दोष मुक्तता होते नि ऑश्वित्झमधील छळछावणीतून बचावलेली एक ज्यू महिला तिने त्याला माफ केले असल्याचे प्रतिपादन करते. ही महिला आणि तिचा हा निर्णय पुढे फार लोकप्रिय झाला होता. तिच्यावर ‘द गर्ल हू फर्गेव द नाझीज’ (२०१६) हा स्वतंत्र माहितीपटदेखील बनला होता. हा घटनाक्रम लक्षात घेता ‘हन्टर्स’ या मालिकेच्या प्रदर्शनानंतर क्रौर्य आणि विनोदाचे मिश्रण पुढे मांडणारा प्रक्षोभक दृष्टिकोन हा वादाचे मूळ बनला, यात काहीच वावगे वाटत नाही. मात्र, अनेक कलाकृती अहिंसेचा पुरस्कार करीत असताना हा रंजक पलायनवाद थोडा का होईना, पण गरजेचा वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT