Onkar Bhojane interview sakal exclusive: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला एक तरुण अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. तो सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता आहे.
हास्यजत्रामधील त्याची यशस्वी वाटचाल, त्यानंतर तिथून बाहेर पडत त्याने निवडलेली नवी वाट.. यामुळे त्याचे कौतुकही झाले आणि टीकाही. पण तो मागे हटला नाही.. 'हौस आकाशी उंच उडायची' म्हणत त्याने झेप घेतली आणि 'सरला एक कोटी'सारखा दमदार चित्रपट केला.
एवढेच नाही तर आता तो 'करून गेलो गाव' या धुमशान घालणाऱ्या मालवणी व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नाटकाची सध्या जोरदार चर्चा असून 'हाऊसफुल्ल'च्या पाट्या झळकत आहेत. याच निमित्ताने हरहुन्नरी ओंकारशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्याने नाटकाच्या दौऱ्याचा खास किस्सा सांगितला.
(Onkar Bhojane shared experience of fans love after watching his marathi drama karun gelo gaon in sakal podcast interview )
सध्या ओंकार 'करून गेलो गाव' या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. भाऊ कदम आणि ओंकार भोजने अशी दमदार जोडी या नाटकातून समोर आल्याने जोरदार प्रतिसाद मिळत आहेत. सध्या या नाटकाचे सर्वच शो हाऊसफुल्ल आहेत. याच नाटकाच्या दौऱ्या दरम्यानचा किस्सा ओंकारने सांगितला.
ओंकार म्हणाला, 'या आधी 'हास्यजत्रा' केली, 'फू बाई फू' केलं.. तेव्हाही खूप प्रसिद्धी मिळाली. लोकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या, प्रेम मिळालं. पान आम्ही केवळ टीव्हीवर दिसत असल्याने प्रेक्षकांचं प्रेम कधी अनुभवता आलं नाही. पण व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करत असल्याने आता प्रेक्षकांचा थेट संपर्क येतो आहे. '
'लोक येऊन भेटतात, बोलतात. त्यांच्या भावना व्यक्त करतात. नाटकामुळे प्रेक्षकांचा आणि माझं खूपच जवळून संबंध येत आहे. यातूनच प्रेक्षकांच्या प्रेमाचा अनुभव येत आहे. प्रेक्षक माझ्यावर इतकं प्रेम करतात की प्रत्येक प्रयोगाला अनेक प्रेक्षक माझ्यासाठी काही ना काही खायला घेऊनच येतात. त्यामुळे कपडे कमी आणि प्रेक्षकांनी दिलेला खाऊच जास्त होत आहे.'
पुढे तो म्हणाला, 'शेवटी आम्ही ठरवलं की आता दोन बॅग सोबत बाळगायच्या. एका बॅगेत आपले कपडे ठेवायचे आणि एक बॅग फक्त प्रेक्षकांनी दिलेला खाऊ ठेवण्यासाठी वापरायची.' असा खास प्रेक्षक प्रेमाचा किस्सा ओंकारने सांगितला.
याशिवाय ओंकारने त्याच्या प्रेमाविषयी, वैयक्तिक आयुष्या विषयी अनेक गोष्टी या मुलाखतीत सांगितल्या. तेव्हा ही सविस्तर मुलाखत वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून नक्की ऐका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.