orry shocking revelation that he is producing his doppelganggers koffee with karan 8 SAKAL
मनोरंजन

Orry: "मी माझेच डुप्लिकेट तयार करतोय कारण..." कॉफी विथ करणमध्ये ओरीचा आश्चर्यजनक खुलासा

Devendra Jadhav

Orry Koffee With Karan 8 News: कॉफी विथ करण 8 चा फिनाले एपिसोडमध्ये होस्ट करण जोहरसोबत गप्पा मारायला ओरी सहभागी झाला होता. त्यावेळी ओरीने असं काही सांगितलंय की ते ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल. ओरी पापाराझींसोबत कायमच हशामस्करी करताना दिसतो.

ओरी विविध पार्टी, इव्हेंटमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत फोटोसाठी पोज देताना दिसतो. पण बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत फोटो काढणारा हा ओरी आहे की त्याचा डुप्लिकेट? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण ओरीने कॉफी विथ करण 8 मध्ये आश्चर्यजनक खुलासा केलाय.

मी माझे ओरीयंस तयार करतोय: ओरी

ओरीने कॉफी विथ करण 8 मध्ये खुलासा केला की, "आमच्या ऑफिसमध्ये Relevance Room नावाची खोली आहे. तिथे माझ्यासारखे minions कपडे आहेत. तिकडे लोकांना माझ्यासारखं बोलावं लागेल. ते लोक ओरी क्रमांक 2, ओरी क्रमांक 3 आणि ओरी क्रमांक 4 आहेत. ते सर्व लोकं ओरी आहेत.

माझ्याकडे माझी डुप्लिकेट गँगदेखील आहे. पण ती वेगळी कथा आहे. पण माझ्यासारखे मिनियन बनण्यासाठी तुम्हाला ओरी व्हावं लागेल. तुम्हाला माझ्यासारखा विचार करावा लागेल. खावं लागेल. चालावे लागेल. तुम्हाला माझ्यासारखा स्ट्रगल करावा लागेल.

त्यामुळे Relevance Room मध्ये मी जी गँग तयार करतोय त्यामुळेच मी चर्चेत राहते. सध्या ओरी क्रमांक 2,4, 5 आणि 6 आहेत."

ओरीने पुढे खुलासा केला की, "ओरी रूममध्ये आम्ही माझ्या बर्बादीची तयारी करत आहोत. ओरियंसना मला बर्बाद करण्याची इच्छा आहे. आणि हे लवकरच होईल. आम्ही फक्त एका योग्य आयडियाची वाट पाहत आहोत. तेव्हा माझ्या प्रसिद्धीची 15 मिनिटं संपतील. त्यानंतर आम्ही माझ्या कमबॅकची तयारी करू. माझी 15 मिनिटांची प्रसिद्धी संपवण्यापूर्वी, मी पुन्हा कमबॅको करेन."

प्रसिद्धी माझ्या डोक्यात गेलीय: ओरी

ओरी शेवटी म्हणतो, "लोकं म्हणतात की मी नाहीसा होईल. मी फक्त त्या वेळेची वाट पाहतोय. प्रसिद्धी माझ्या डोक्यात गेली आहे. होय, प्रसिद्धी माझ्या डोक्यात गेली आहे. मी कबूल करतो की, माझ्यात थोडा अॅटिट्यूड आहे. माझा विश्वास आहे की, मी इतर सर्वांपेक्षा चांगला आहे. पण आता मी माझ्या बर्बादीची तयारी करत आहे. जे काही वर जाते ते खाली आले पाहिजे. मी माझ्या Relevance Room मध्ये माझ्या बर्बादीची योजना आखत आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT