James Franco  Instagram
मनोरंजन

'मला सेक्सचं व्यसन होतं,' विद्यार्थ्यांसोबत शरीरसंबंध ठेवल्याची अभिनेत्याची कबुली

या अभिनेत्याला प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

सकाळ डिजिटल टीम

ग्रॅमी पुरस्कार विजेती अमेरिकन गायिका बिली एलिश हीने तिच्या पॉर्न पाहण्याच्या व्यसनाबद्दल व्यक्त झाल्यानंतर आता प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता जेम्स फ्रँको (James Franco) याने त्याच्या वाईट सवयींबद्दल धक्कादायक कबुली दिली. स्वत:च्याच अ‍ॅक्टिंग स्कूलमधल्या विद्यार्थ्यांसोबत शरीरसंबंध ठेवल्याचं त्याने कबूल केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या सेक्सच्या व्यसनाविषयी व्यक्त झाला असून आपल्यात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं. ४३ वर्षीय जेम्सने 'द जेस कॅगल' पॉडकास्टमध्ये स्वत:विषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. बुधवारी हा पॉडकास्ट प्रसारित करण्यात आला. 'मी माझ्या अ‍ॅक्टिंग स्कूलमधल्या विद्यार्थ्यांसोबत शरीरसंबंध ठेवले आणि ते खूप चुकीचं होतं. अर्थात मी माझ्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी ती शाळा उघडली नव्हती', असं तो म्हणाला. (James Franco podcast interview)

'त्यावेळी मला वाटलं किंवा माझा विचार असा होता की जर समोरची व्यक्ती सहमत असेल तर ठीक आहे. त्यावेळी माझ्या आयुष्यात बरीच गुंतागुंत होती. माझं डोकं ठिकाण्यावर नव्हतं,' असं फ्रँकने सांगितलं. जवळपास चार वर्षांपूर्वी 'लॉस अँजिलिस टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार फ्रँकोवर पाच महिलांनी गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. त्यानंतर या आरोपांविषयी तो पहिल्यांदाच व्यक्त झाला. ऑक्टोबर २०१९ मध्ये, दोन महिलांनी त्याच्याविरोधात खटला दाखल केला होता. या महिलांनी फ्रँकोवर त्याच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमधील महत्त्वाकांक्षी अभिनेत्रींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडीओ शूट करण्यासाठी त्यांना फसवल्याचा आरोप केला होता.

फ्रँकोला तरुण वयातच दारूचं व्यसन जडलं होतं. मात्र दारूचं व्यसन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना सेक्सचं व्यसन निर्माण झाल्याचं त्याने सांगितलं. "माझ्यासाठी ते खूप पॉवरफूल औषध होतं. जवळपास २० वर्षे मी त्या व्यसनात गुंतलो होतो आणि यातली विचित्र बाब म्हणजे त्या संपूर्ण काळात मी दारूपासून लांब राहिलो”, अशी कबुली त्याने दिली.

२०११ मध्ये फ्रँकोने प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सहनिवेदन केलं होतं आणि १२७ अव्हर्समधील त्याच्या अभिनयासाठी २०१२ मध्ये त्याला ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. लॉस अँजिलिसच्या वरिष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, फ्रँकोने २०१९ मधील खटला निकाली काढण्यासाठी यावर्षी २.२ दशलक्ष डॉलर्स देण्याचं मान्य केलं आहे. पॉडकास्ट मुलाखतीत फ्रँकोने असंही सांगितलं की तो २०१६ पासून सेक्सच्या व्यसनातून बरा होण्यासाठी आणि स्वत:ला बदलण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. 'मला लोकांना दुखवायचं नाहीये', अशी भावना त्याने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT