oscars 2022 : writing with fire  google
मनोरंजन

Oscars 2022 : writing with fire; म्हणजे व्यवस्थेला जबर धक्का देणारी दलित महिलांची टोळी

भारतातील दलित स्त्रियांच्या व्यथा आणि त्यांच्यातील ताकद मार्मिकपणे जगापुढे मांडणाऱ्या आणि आॅस्कर नामांकन मिळवणाऱ्या 'रायटिंग विथ फायर' विषयी थोडक्यात...

नीलेश अडसूळ

Oscars 2022 : ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारताच्या 'रायटिंग विथ फायर'ला (writing with fire) ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला नसला तरी या पुरस्कारासाठी नामांकन मिळणे ही देखील अनन्यसाधारण बाब आहे. त्यामुळे या चित्रपटाचे कौतुक हे व्हायलाच हवे. भारतातील दलित स्त्रियांच्या व्यथा आणि त्यांच्यातील ताकद मार्मिकपणे जगापुढे मांडणाऱ्या आणि आॅस्कर नामांकन मिळवणाऱ्या हा 'रायटिंग विथ फायर' कसा आहे. त्याविषयी थोडक्यात...

'घोष अॅण्ड थॉमस ब्लॅक तिकिट फिल्म्स बॅनर' या निर्मिती संस्थेने तयार केलेला हा महितीपट जळजळीत वास्तवाचे दर्शन घडवतो. या माहितीपटाचे दिग्दर्शन सुष्मित घोष आणि रिंटू थॉमस यांनी केले आहे. हा माहीतीपट केवळ दलित महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका वृत्तपत्राची आणि त्या महिलांची कहाणी सांगत नाही तर समस्त समाजातील विषमता आणि अधोगामी विचारधारेला जगापुढे आणतो. यातील 'वृत्तपत्र निर्मिती' हे माहितीपटाच्या केंद्रस्थानी असले तरी स्त्रियांमधील असामान्य ऊर्जचा विस्फोट झाल्यावर त्या काय करू शकतात याची ही हलकीशी झलक म्हणता येईल.

उत्तरप्रदेशमधील छोट्याशा गावातून एका वृत्तपत्राची सुरुवात करुन डिजिटल क्षेत्रापर्यंतचा त्यांचा प्रवास या ९० मिनिटाच्या माहीतापटात आहे. ही घटना वीस वर्षांपूर्वीची असली तरी आजही परिस्थिती फारशी बदलेली नसल्याची प्रचिती हा माहितीपट पाहून येते. तर घडले असे की, उत्तरप्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातील करवी या छोट्याशा गावातील दलित महिलांनी मिळून साधारण २००० साली एक वृत्तपत्र सुरु केले आणि 'खबर लहरिया' असे या साप्ताहिक वृत्तपत्राचे नाव देण्यात आले. या वृत्तपत्राचा पहला अंक २००० साली मे महिन्यात छापून आला. आठ पानाच्या वृत्तपत्रासाठी या दलित महिलांनी गावोगाव फिरुन बातम्या मिळवल्या आणि कामात सातत्य ठेवले . त्यानंतर २०१२ मध्ये या वृत्तपत्राने उत्तरप्रदेशमधील माहोबा, लखनउ आणि वाराणसी या शहरात वेगवेगळ्या भाषेत या साप्ताहिकाची आवृत्ती देखील सुरु केली. आज या महिला डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील काम करत आहेत. त्यांच्या याच प्रगतीचा आलेख घोष आणि थॉमस यांनी जगापुढे आणला आहे.

oscars 2022 : writing with fire

वृत्तपत्र काढणे म्हणजे अनेकांना हे सहज वाटेलही पण ज्या परिस्थितीत या महिलांनी हे निभावले हे कौतुकास्पद आहे. त्याचीच जाणीव हा माहितीपट करून देतो. समाजातील जातीय विषमता, शिक्षण आणि महिलांकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन अशा प्रमुख समस्या या महिलांपुढे आहेत. त्याचबरोबर स्त्रीवाद, असाक्षरता आणि समाजातील लिंगभेद यावर त्यांचे जास्त लक्ष आहे. मुख्य संपादक मीरा जाटव आणि गुन्हे वार्ताहर संगीता या दोघीजणी या वृत्तपत्राच्या आधारस्तंभ आहेत. हे भारतातील एकमेव महिला प्रकाशित वत्तपत्र असून एकूण ४० ग्रामीण भागातील महिला यामध्ये सध्या काम करत आहेत. अत्यंत बिकट काळात तोंड देऊन पत्रकारिता करणाऱ्या महिलांच्या अफाट बुद्धिमत्तेची साक्ष हा माहीतीपट देतो.

वाढत्या ध्रुविकरणाच्या या युगात या महिला मोठ्या समस्येवर लिहिण्याचे धाडस करतात, त्याचबरोबर घराच्या रूढी आणि परंपरेचा भंग त्या करतात स्वतःसाठी, समाजासाठी उभ्या राहतात. जातीच्या विळख्याला चिरून काढतात. त्यांची ही शक्ती, काळाला धडक देण्याची ताकद आपल्यालाही कशी उर्जित करते.

या महिलांनी तंत्रज्ञानाशीही मैत्री केली. दिवसेंदिवस बदलत्या तंत्रज्ञांच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञानाशी आणि मोबाईलशी तिळमात्र संबंध नसताना त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि आता त्या सर्व यंत्रे लीलया हाताळत आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून आलेली नवी पत्रकारिता त्यांनी स्वीकारली आहे. ज्या भागात महिला घराबाहेर पडणे दुरापास्त आहे अशा ठिकाणी त्या पत्रकार होण्याचे धाडस करतात आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवून तिथल्या समस्या लेखणीतून जगापुढे आणतात. शब्दांपलीकडे जाणारा असा त्यांचा संघर्ष आहे, जो कळण्यासाठी आपल्याला माहीतीपटच पहावा लागेल. पण थोडक्यात सांगायचे तर व्यवस्थेविरुद्ध बंड करून समाजाला नवा आयाम देणाऱ्या या महिला पत्रकार आपल्या मनालाही सहज चेतवून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT