Oscars 2024 Shortlist India's official Oscar entry Malayalam film '2018 fails to make it to final 15 director apologises Esakal
मनोरंजन

Oscars 2024 Shortlist: यंदाही भारताला ऑस्कर नाहीच! मल्याळम चित्रपट '2018' शर्यतीतून बाहेर; दिग्दर्शकानं मागितली माफी

'2018' हा चित्रपट शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवू शकला नाही.

Vaishali Patil

Malayalam Film  2018 Everyone Is A Hero Out Form Oscars Race: गेल्या काही दिवसांपासून ऑस्कर पुरस्काराबाबात भारतीयांना खुप अपेक्षा होती. मात्र ऑस्करच्या शर्यतीत भारत पुन्हा बाहेर गेला आहे. यंदा भारताकडून '2018: एव्हरीवन इज अ हिरो' हा मल्याळम चित्रपट 96 व्या अकादमी पुरस्कारांसाठी आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत पाठवण्यात आला होता. मात्र आता हा चित्रपट अकादमी पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने शुक्रवारी ऑस्कर 2024 साठी चित्रपटांची शॉर्टलिस्ट यादी२ जाहीर केली. यामध्ये मल्याळम चित्रपट '2018' चित्रपटाचे नाव नाही. त्यामुळे भारतीयांची निराशा झाली आहे.

'2018' हा चित्रपट शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवू शकला नाही. अकादमीने मूळ गाणे, डॉक्युमेंटरी फीचर, इंटरनॅशनल फीचर, ओरिजिनल स्कोअर यासह 10 श्रेणींमध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांची घोषणा केली आहे. या यादित 'बार्बी', 'ओपेनहाइमर' आणि 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' या चित्रपटांचा सामावेश आहे.

ऑस्करच्या शर्यतीतून चित्रपट बाहेर पडल्यानंतर '2018' चे दिग्दर्शक ज्युड अँथनी जोसेफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत निराशा व्यक्त केली. जोसेफने शॉर्टलिस्ट केलेल्या 15 चित्रपटांचा स्क्रीनशॉट शेअर करत त्याच्या हितचिंतकांची आणि चाहत्यांची माफी मागितली आहे.

ऑस्‍कर अवॉर्ड 2024 च्‍या अधिकृत एंट्रीसाठी भारताने पाठवलेला '2018' हा चित्रपट केरळमधील पुराच्‍या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, '2018' हा चित्रपट केवळ 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, परंतु त्याने 100 कोटींहून अधिक कमाई केली. ज्युड अँथनी जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटात टोविनो थॉमस, कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.



'2018 एव्हरीवन इज अ हिरो' च्या स्टोरीबद्दल सांगायचं तर हा चित्रपट 2018 साली आलेल्या केरळ पुरावर आधारित आहे. पुरासारख्या समस्येवर मात करणाऱ्या लोकांची गोष्ट या चित्रपटात उत्तमरीत्या दाखवण्यात आली आहे. 2018 मध्ये आलेल्या केरळच्या महापुराने राज्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT