OTT Releases Of This Week  esakal
मनोरंजन

OTT New Released : नव्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? फुल्ल टू मनोरंजनाची गॅरंटी!

नव्या वर्षाच्या सुरुवातीला ओटीटी मनोरंजन विश्वातून वेगवेगळ्या घडामोडी समोर आल्या आहेत.

युगंधर ताजणे

OTT Releases Of This Week : नव्या वर्षाच्या सुरुवातीला ओटीटी मनोरंजन विश्वातून वेगवेगळ्या घडामोडी समोर आल्या आहेत. नवं वर्ष सुरु झालं की, वेध लागतात आवडत्या सेलिब्रेटींच्या कोणत्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत याचे. सध्या ओटीटीवर आगामी आठवड्यात प्रदर्शित होणारे चित्रपट आणि मालिका याविषयी आपण जाणून घेणार आहोत

1. इको (Echo)

मायाची कथा इकोमधून सांगण्यात आली आहे. तिच्या अमेरिकेतील जन्मगावी जे काही घडलं त्याचे संदर्भ पुढेही डोकावणार आहेत. त्याविषयी तिलाही अद्याप कल्पना नाही. ११ जानेवारी रोजी डिझ्नी हॉटस्टारवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

2. किलर सूप (Killer Soup)

प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीची द सूप नावाची मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचा ट्रेलरही आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये कोंकणा सेन ही मुख्य अभिनेत्री म्हणून मनोजसोबत स्क्रीन शेयर करणार आहे. यामध्ये सयाजी शिंदे, लाल, अनबुथूसान, अनुला नवलेकर आणि कनी कुश्रृती यांच्या मुख्य भूमिका आहेत. ११ जानेवारी २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

3. कोटाबोम्मल्ली पीएस (Kotabommali PS)

एका पोलीस अधिकाऱ्याच्या भोवती फिरणारं वेगवान कथानक अन् त्यातून होणारे धक्कादायक खुलासे हे सगळं कोटाबोम्मल्ली पीएसमधून पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये श्रीकांत, वराळक्ष्मी, राहुल विजय आणि शिवानी राजशेखर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ११ जानेवारी २०२४ रोजी अहा नावाच्या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

4. मिशन इम्पॉसिबल ७, (Mission Impossible 7)

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर ११ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यापूर्वी मिशन इम्पॉसिबलच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. यावेळच्या चित्रपटात एथन हंट आणि त्याचे आएमएफचे मिशन याला फोकस करण्यात आले आहे.

5. एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन - ( Extra Ordinary Man)

ही मालिका अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्यामध्ये नितीन, रोहिनी. श्रीलिला, लिथिका, राव रमेश. सुदेव नायक आणि राजशेखर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभीला उद्देशन गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेची स्टोरी टेलिंग जबरदस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. १२ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

6. किलर्स ऑफ द फ्लॉवर (Killers of the Flower Moon)

किलर्स ऑफ द फ्लॉवर हा देखील चर्चेत असणारा चित्रपट आहे. तो १२ जानेवारी रोजी अॅपल प्लस टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. मॉली बुकहार्टच्या अवती भोवती फिरणारं हे कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

7. द लिजंड ऑफ हनुमान - सीझन ३ (The Legend of Hanuman Season 3)

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक द लिजंड ऑफ हनुमान च्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. पहिल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजमध्ये भगवान हनुमान यांच्या पराक्रम अन् त्यांची शौर्यगाथा या निमित्तानं समोर येणार आहे. १२ जानेवारी नंतर ही मालिका डिझ्नी हॉटस्टार वर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT