Padma Vibhushan Padma Bhushan Awards 2024 esakal
मनोरंजन

Padma Awards 2024: मिथुनला 'पद्म भुषण' तर चिरंजीवीला 'पद्मविभुषण', सिनेक्षेत्रातील कोणकोणत्या चित्रतारकांना मिळाले पद्मपुरस्कार

विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

युगंधर ताजणे

Padma Vibhushan Padma Bhushan Awards 2024 : विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती, दिवंगत तमिळ अभिनेता विजयकांत, गायिका उषा उत्थुप यांना पद्म भुषण पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कांरामधील पद्मश्री, पद्म भुषण आणि पद्म विभुषण या पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. हे पुरस्कार कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि आभियांत्रिकी क्षेत्र तसेच व्यापार आणि उद्योग, संशोधन, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा अन् नागरी सेवेमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. Padma Awards 2024 announced Bollywood actor Mithun Chakraborty

याशिवाय साऊथ चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी अन् बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेत्री वैजयंती माला बाली तसेच भरतनाट्यम नर्तक सुब्रमण्यम यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमधील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार या सेलिब्रेटींना जाहीर झाल्यानं चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आपल्या आगळया वेगळ्या स्टाईल, डान्स आणि अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मिथून यांना पद्म भुषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी मिथुन दादांना शुभेच्छा दिल्या आहेत. मिथुन यांच्या विषयी आणखी सांगायचे झाल्यास १६ जुन १९५० रोजी जन्म झालेल्या मिथुन यांच्या करिअरची सुरुवात मृगया नावाच्या चित्रपटापासून झाली होती. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ८० च्या दशकांत प्रसिद्ध डान्सर म्हणून मिथुन यांना अमाप लोकप्रियता मिळाली होती.

आपल्या करिअरमध्ये ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय करत मिथुन यांनी आतापर्यत बांग्ला, ओडिया, भोजपूरी, हिंदी, या सारख्या वेगवेगळ्या भाषांमधून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

उषा उत्थुप यांच्या विषयी सांगायचे झाल्यास ७० ते ८०वच्या दशकांत त्यांनी आपल्या गायकीतून वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात उमटवली. प्रसिद्ध संगीतकार आरडी बर्मन आणि बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी उषाजींनी ज्या ढंगात सादर केली त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आरडी बर्मन यांच्या मेहबूबा मेहबूबा आणि दम मारो दम सारख्या गाण्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे.

साऊथचे प्रसिद्ध अभिनेता विजयकांत हे साऊथ चित्रपट विश्वातील प्रसिद्ध नाव होते. विजयकांत यांचे पूर्ण नाव नारायणन् विजयराज अलगारस्वामी असे होते. तमिळ सिनेमा विश्वात त्यांनी ८० ते ९० च्या दशकांत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. २०११ ते २०१६ या काळात ते तमिळनाडू विधानसभेचे ते प्रतिनिधी होते. राजकारणात येण्यापूर्वी ते अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शकाच्या रुपात प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT