Pakistan Shameful Act: प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा काही भरवसा नाही मात्र आपण त्या नादात काय करतो आहोत याचे भानही अनेकांना राहत नाही. (Viral news) असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर दिसून आला आहे. पाकिस्तान हे राष्ट्र नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या कुरापती करणे, कोणत्याही (Social media viral video) कारणावरुन डिवचत राहणे यासाठी ओळखले जाते. त्यांनी आता जी कृती केली आहे त्यावरुन त्यांना काय म्हणावे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हॉटेलमध्ये ग्राहक बोलवण्यासाठी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia bhatt) गंगुबाई काठियावाड मधील एक व्हिडिओ लावला आहे. त्या व्हिडिओमध्ये आलिया ‘आजा ना राजा’ असं म्हणून बोलावताना दिसते.
पाकिस्तानमधल्या एका हॉटेलच्या बाहेर लावलेला हा व्हिडिओ सध्या सोशल (bollywood actress) मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. अशाप्रकारे एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपमान करणे तुम्हाला शोभत नाही असं एका नेटकऱ्यानं पाकिस्तानला सुनावले आहे. तर आणखी काही जणांनी हे कृत्य किळसवाणे असल्याचे म्हटले आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाड या चित्रपटामध्ये आलियानं एका गंगुबाईची भूमिका केली आहे. जी कामाठीपुरा येथे वेश्याव्यवसाय करते. त्यात ग्राहकांना बोलवण्यासाठीचा जो प्रसंग आहे पाकिस्तानमधील एका हॉटेलच्या बाहेर लावण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या याप्रकारच्या कृत्याचा नेटकऱ्यांनी निषेध केला आहे. त्यांच्यावर कडाडून टीकाही केली आहे. कराचीमध्ये असणाऱ्या त्या हॉटेलमधील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आलियाच्या त्या व्हिडिओचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्याच्यावरुन वाद सुरु असतानाही अद्याप तो व्हिडिओ दाखविण्यात येत आहे. पाकिस्ताननं एखाद्या चित्रपटातील स्त्री भूमिकेचा अशा प्रकारे उपयोग करणे हे निंदनीय असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
तो व्हिडिओ पाहून जे पुरुष ग्राहक त्या हॉटेलमध्ये जात आहेत त्यांना 25 टक्के रुपयांची सुटही देण्यात येत आहे. सोमवारी संबंधित हॉटेलच्या मालकानं ही ऑफर सुरु केली होती. त्या ऑफऱवर लिहिण्यात आले होते की, आजा ना राजा, किसका इंतजार है, हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या वादाला सुरुवात झाली. जाहिरातीसाठी अशा प्रकारचे कृत्य करणे यामुळे पाकिस्तानवर रोष व्यक्त करण्यात आला आहे. यावर एका युझर्सनं म्हटलं आहे की, तुम्ही तुमच्या फायद्यासाठी अशा प्रकारचा वेदनादायी व्हिडिओ लावून प्रसिद्धी करता तेव्हा त्याचे वाईट वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.