Pakistani Singer Atif Aslam Comeback Bollywood After 7 Years With song Love Story Of 90’s SAKAL
मनोरंजन

Atif Aslam: पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीनंतर अतीफ अस्लमचं ७ वर्षांनी बॉलिवूड कमबॅक, या सिनेमात गाणार गाणं

अतीफ अस्लम ७ वर्षांनी बॉलिवूड कमबॅक करतोय

Devendra Jadhav

Atif Aslam Comeback News: पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमने गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये गाणी गायली नाहीत. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यापूर्वी 'टायगर जिंदा है'मधील अतीफने गायलेलं 'दिल दियां गल्लन' हे गाणे खुप गाजलं.

याशिवाय 2005 मध्ये आलेल्या 'कलयुग' चित्रपटातील 'आदत' हे अतिफने गायलेलं गाणं खुप गाजलंय. अशातच अतिफच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. अतिफ ७ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय.

भारतात त्याचे शेवटचे गाणे रेकॉर्ड केल्यानंतर जवळपास 7 वर्षांनी अतिफ आता बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. बॉलिवूड चित्रपट 'लव्ह स्टोरी ऑफ 90' (LSO90's) या सिनेमात अतीफ गाणं गाणार आहे. दिग्दर्शक अमित कसारिया यांच्या या चित्रपटात अध्ययन सुमन आणि मिस युनिव्हर्स दिवा दिविता राय प्रमुख भूमिकेत आहेत.

बंदी उठल्यानंतर अतिफ बॉलिवूडमध्ये परतणारा पहिला कलाकार

2016 मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. 'सुरक्षा' आणि 'देशभक्ती'चा हवाला देत इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने सीमेपलीकडील टॅलेंटला भारतात काम करू देणार नाही असा नियम केला होता. त्यानंतर फवाद खान, माहिर खान, अली जफर आणि राहत फतेह अली खान सारख्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी घालण्यात आली.

ऑक्टोबर 2023 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने 'सांस्कृतिक सौहार्द, एकता आणि शांततेला अनुकूल' असे म्हणत बंदी उठवली. परदेशी लोकांना, विशेषत: शेजारील देशांतील नागरिकांचा विरोध करणे देशभक्ती दाखवत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये कामं करण्याची दारे खुली झाली आहेत. या निर्णयानंतर अतिफ हा पहिला मोठा पाकिस्तानी कलाकार आहे जो बॉलिवूडमध्ये परतणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT