Shweta Tiwari, Palak Tiwari Esakal
मनोरंजन

Palak Tiwari चा आई श्वेता तिवारी संदर्भात हैराण करणारा खुलासा, म्हणाली,'ती माझे कॉलही उचलत नाही कारण...'

सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामधून पलक तिवारीनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

प्रणाली मोरे

Palak Tiwari नं 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमात जेव्हापासून पलक काम करतेय हे समोर आलेलं तेव्हापासून तिची जोरदार चर्चा रंगलेली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं पलकनं दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपलीआई अभिनेत्री श्वेता तिवारीविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. या मुलाखतीत पलकनं आईसोबतचं तिचं बॉन्डिंग शेअर केलं आहे.

मिड-डे ला दिलेल्या एका मुलाखतीत पलकनं अनेक विषयांवर बातचीत केली आहे. आपल्या आईसोबत आपलं कसं बॉन्डिंग आहे याविषयी तिनं काही गोष्टी शेअर केल्या आहेत ज्या हैराण करून सोडतील.

पलक म्हणाली,''मी सलमान खानच्या सिनेमात काम करतेय हे जर माझ्या आईला माहित नसतं तर तिनं माझ्यावर अधिक करडी नजर ठेवली असती. पण मी सलमान खानच्या सिनेमात काम करते हे ऐकून ती निश्चिंत होती''.(Palak Tiwari Opens Up about Mother Shweta Tiwari)

पलक तिवारी पुढे म्हणाली की,'' तसं पाहिलं तर माझं आणि माझ्या आईचं प्रेम ५०-५० टक्के आहे असं म्हणता येणार नाही. हे पूर्णपणे एकतर्फा प्रेम आहे. मी सतत तिचाच विचार करत असते आणि ती फक्त मला सहन करत असते. आणि तिला करावं लागतं कारण मी तिची मुलगी आहे. मी आताही दिवसांतून किमान ३० वेळा तरी तिला कॉल करते. आणि ती माझ्या कितीतरी कॉलकडे जवळपास दुर्लक्ष करते''.

श्वेता तिवारीविषयी बोलायचं झालं तर ती टी.व्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या दमदार अभिनयशैलीसाठी तिला ओळखलं जातं. २००१ साली आलेली 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील 'प्रेरणा' या व्यक्तिरेखेमुळे श्वेता तिवारी हे नाव घराघरात पोहोचलं होतं.

सध्या ती 'मै हू अपराजिता' या मालिकेत आईची व्यक्तिरेखा साकारत आहे. एवढंच नाही तर श्वेता अनेक रिअॅलिटी शोचा भाग राहिली आहे. 'झलक दिखला जा', 'खतरों के खिलाडी',आणि 'बिग बॉस ४' मध्ये तिनं सहभाग घेतला होता आणि विजेतेही बनली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT