अभिनेत्री श्वेता तिवारीची(Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी(Palak TIwari) लवकरच 'रोजी-द केसर चॅप्टर' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. पलकनं आपली आई श्वेता तिवारीला तिच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करताना पाहिलं आहे. इतकंच नाही तर तिनं नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या आईच्या वैवाहिक जीवनावर मोठा खुलासा देखील केला आहे.
श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरचं एक प्रसिद्ध नाव. १९९९ मध्ये तिनं राजा चौधरीशी लग्न केलं. पलकचा जन्म त्यानंतर एक वर्षानं झाला. २००७ मध्ये श्वेतानं राजाला घटस्फोट दिला. त्यानंतर श्वेतानं २०१३ मध्ये अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं,पण ते लग्न देखील केवळ चार-पाच वर्ष टिकलं. २०१९ मध्ये खूप वाईट पद्धतीनं दोघांनी आपलं नातं संपवलं. श्वेताला आपल्या दुसऱ्या लग्नापासून एक मुलगा देखील झाला आहे. आता तो श्वेता आणि पलकसोबतच राहतो. पलक तिवारीनं मीडियाला मुलाखत देताना आपल्या आईच्या लग्नातील संघर्षाविषयी पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
ती म्हणाली,''तिच्या आईनं वैवाहिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. कोणीच लग्नाची घाई करायला नको. लग्नासारखा मोठा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. आणि तरीही लग्न घाईनं केलंच तर जर तुमचं आपल्या जोडीदाराशी पटत नसेल,नात्यात काहीतरी चूकीच घडत असेल तर ते नातं तिथेच संपवणं योग्य आहे''. पलक पुढे म्हणाली,''आपण अनेकदा आपल्या जोडीदाराचं चुकत असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करतो,कारण आपल्याला आपलं नातं टिकवायचं असतं. हा खुप खरंतर चांगला गुण आहे. पण यामुळे अनेकदा आपलंच नुकसान होऊ शकतं. हे प्रेम नाही किंवा मी तरी याला प्रेम समजत नाही. खूप महिला नात्यात असं वागून संघर्ष करत जीवन जगताना दिसतात. आणि जे माझ्या आईसोबत घडलं ते जगात अनेक इतर महिलांसोबत घडलं असेल''.
पलक तिवारीनं शेअर केलंय की,''माझ्या आईशी संबधित अनेक अफवा अन् चुकीच्या बातम्या पसरलेल्या आजुबाजूला दिसतात. पण आम्ही कधीच आमची बाजू ओरडून मांडण्याचा प्रयत्न करत नाही,हो पण चुकीचं सहनही करत नाही,तेव्हाच उत्तर देऊन टाकतो. माझ्या आईसाठी तिच्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आणि आता माझ्यासाठी देखील तेच महत्त्वाचं आहे''. पलक तिवारीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती हार्डी संधूच्या 'बिजली बिजली' या म्युझिक व्हिडीओत दिसली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.