Pankaj Tripathi News: पंकज त्रिपाठी हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. पंकज त्रिपाठींच्या बाबांचं त्यांच्या मुळ गावी बेलसंड येथे निधन झालं. बाबांच्या निधनामुळे पंकज त्रिपाठी आणि त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
पंकज त्रिपाठी मुंबईत त्यांचं नशीब आजवायला आले आणि ते प्रसिद्ध झाले. पण त्यांशी गावाशी नाळ अजुन जोडलेली आहे. याचा अनुभव नुकताच आला. पंकज त्रिपाठी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ असं काम केलंय की, खऱ्या अर्थाने त्यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.
(pankaj tripathi build library in their village on his father memorial)
पंकज त्रिपाठी उभारणार ग्रंथालय
पंकज त्रिपाठी वडिलांचं श्राद्धविधी करायला गावी गेले होते. तेव्हा मुंबईत परतण्यापूर्वी पंकज त्रिपाठी आपल्या गावातील माध्यमिक शाळेत गेले होते.
तिथे पंकज यांनी मुलांना अभ्यासाच्या काही टिप्स दिल्या. याशिवाय शाळेत उत्तम व्यवस्था करण्याबाबत मुलांशी आणि शाळा व्यवस्थापनाशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. यासोबतच त्यांनी गावातील सरकारी शाळेतील मुलांसाठी वाचनालय उभारलंय.
पंकज त्रिपाठी शाळेत काय म्हणाले
पंकज त्रिपाठी लहानपणी बेलसंड येथील उच्च माध्यमिक शाळेत शिकले आहेत. याच शाळेतुन शिक्षणाचा पाया घट्ट करुन ते पुढील शिक्षणासाठी पाटण्याला गेले. तेथून ते पुन्हा मुंबईला आले. पण जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल. ते त्यांच्या गावी येतात. त्यांच्या गावातील शाळेचा विकास करण्याची सामाजिक जबाबदारी त्यांनी उचलले आहे. मुलांना शिकण्यासाठी चांगले वातावरण मिळावे म्हणूनच त्यांना उत्तम व्यवस्था करायची आहे. जेणेकरून या गावातील मुलांमध्ये अभ्यासाची गोडी लागेल.
पंकज त्रिपाठी, त्यांचा मोठा भाऊ बिजेंद्र तिवारी, पुतण्या मधेश तिवारी या तिघांनी मिळून शाळेत वाचनालय स्थापन केले आहे. या वाचनालयात मनोरंजक कथा पुस्तके, प्रेरणादायी पुस्तके आणि इतर अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकांचा संग्रह आहे.
श्राद्धविधीच्या वेळी लोकांची उडाली झुंबड
अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडीलांचा श्राद्ध सोहळा 1 सप्टेंबर रोजी पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे, चिराग पासवान यांच्यासह अनेक मंत्री पंकजच्या वडीलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बिहारमधील बरौली येथील बेलसंद गावात पोहोचले.
पंकज त्रिपाठी सकाळपासून वडिलांच्या श्राद्धविधीसाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत, लोकांच्या भेटीगाठी करत होते. यावेळी सेल्फी काढणाऱ्यांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे पंकज त्रिपाठींना गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी बाऊन्सरला पाचारण करावं लागलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.