Paresh Rawal summoned by Calcutta Police over 'cook fish for Bengalis' remark  sakal
मनोरंजन

Paresh Rawal: बंगाल्यांनी जिरवली.. वादग्रस्त विधानाबद्दल परेश रावल यांना समन्स..

परेश रावल यांना बंगाली लोकांबद्दल बेताल वक्तव्य करणं भोवलं..

नीलेश अडसूळ

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांचे ‘बंगालींसाठी मासे शिजवा’ हे वादग्रस्त विधान त्यांना चांगलेच भोवले आहे. हे विधान सोशल मीडियावर इतके गाजले की त्याचा आता सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या विधानामुळे लोकांच्या भावना दुखावल्याने आणि राजकीय व्यासपीठावरून चिथावणीखोर भाष्य केल्याने परेश रावला यांना कोलकाता पोलिसांनी समन्स बजावले आहे.

(Paresh Rawal summoned by Calcutta Police over cook fish for Bengalis remark)

झाले असे की, विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजपच्या प्रचारादरम्यान गुजरातच्या वलसाडमध्ये पक्षाचा प्रचार करताना परेश रावल म्हणाले होते, 'गॅस सिलिंडर महाग आहेत, पण त्यांची किंमत कमी होईल. लोकांना रोजगार मिळेल, गुजरातमध्ये राहणारे लोक महागाई सहन करतील, पण शेजारच्या घरात रोहिंग्या निर्वासित किंवा बांगलादेशी आले तर ते गॅस सिलिंडरचे काय करणार? बंगालींसाठी मासे शिजवणार का?' या विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

त्यांच्या या वादग्रस्त विधानवर 'टीएमसी'च्या खासदार महुआ मोईत्रा या भडकल्या होत्या‌. त्यानंतर परेश रावलने ट्विटरवर लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली होती. परेश यांनी लिहिले होते की, “मासे हा मूळ मुद्दा नाही.. कारण गुजराती भाषिकही मासे शिजवतात आणि खातात. पण मी स्पष्ट करू इच्छितो की बंगालमध्ये ज्याप्रमाणे बेकायदेशीर बांगलादेशी एन रोहिंग्याना आसरा देतात‌ ते चुकीचे आहे. पण तरीही तुमच्या भावना आणि भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो.' पण या माफी नंतरही कोलकाता पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण परेश रावला यांच्या चांगलचं अंगाशी आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT