The kashmir files : 'द काश्मीर फाईल्स' (vivek agnihotri) या चित्रपटाने नुकताच ३०० कोटींचा टप्पा पूर्ण केला. या चित्रपटाला जितके प्रेक्षकांचे प्रेम मिळाले तितकाच विरोधही झाला. काहींनी हा चित्रपट ओढून ताडून मुस्लिम द्वेष निर्माण करण्यासाठी बनवला गेला असल्याचे मत मांडले तर काहींनी यातील वास्तवाला मोठ्या प्रमाणात समर्थन दिले. पुढे या चित्रपटाच्या वादाने राजकीय वळणही घेतले. समाज माध्यमांवर अक्षरशः वादाच्या फैरी उडाल्या. त्यातच मागील आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejariwal) यांनी या वादात उडी घेतली.
या चित्रपटाने भरपूर पैसे कमावले असून आता तो यु ट्यूब वर टाकावा, भाजपचे लोक या चित्रपटाचा प्रसार प्रचार करत आहेत, आता कोणते कामच उरले नाही का? अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी खिल्ली उडवत संसदेत हास्याची खसखस पिकवली हाती. परंतु हे विधान त्यांना चांगलेच महागात पडले आहे. अरविंद केजरीवालांनी काश्मिरी पंडितांचे दुःख समजूनघेण्याऐवजी त्यांची थट्टा उडवत आहे अशी टीका करत केजरीवाल यांना अनेकांनी धारेवर धरले. अजूनही सत्र सुरूच आहे.
केजरीवालांच्या याच विधानावर अभिनेते परेश रावल (paresh rawal) यांनीही निशाणा साधला आहे. परेश रावल यांनी केजरीवाल यांचे नाव न घेता ट्विटरद्वारे खरपूस शब्दात सुनावले आहे. ते लिहितात, 'जो आपल्या मुलांची खोटी शपथ घेऊ शकतो, तो पंडितांची काळजी काय करणार,' हे लिहिताना त्यांनी काश्मीर फाईल्स असा हॅशटॅग वापरला आहे.
परेश रावल यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, 'द कश्मीर फाइल्सच नाही तर यांनी दूरदर्शनवर रामायण दाखवण्यासही विरोध केला होता,' आठवतंय का? असा प्रश्न त्याने परेश रावल यांना विचारला आहे. त्यावर परेश रावल पुन्हा उपहासात्मक उत्तर देतात, ' ते आता अयोध्यासाठी स्पेशल ट्रेन काढत आहेत.
'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावरून समाजमाध्यमावर अनेकांचे वाकयुद्ध रंगताना दिसले. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला तरी हा वाद मिटलेला नाही. रोज नवे वाद, नवी उत्तरे दिली जात आहे. आता या वादावर केजरीवाल काय व्यक्त होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.