Parineet-Raghav Engagement Esakal
मनोरंजन

Parineet-Raghav Engagement: साखरपुड्याच्या आऊटफिट्ससाठी परिणीती- राघव यांनी दिली 'या' दोन रंगांना पसंती

साखरपुड्याच्या आऊटफिटसाठी परिणीतीनं मनिष मल्होत्राला पसंती दिली असली तरी राघव चड्ढा यांनी मात्र वेगळ्याच डिझाईनरकडनं ड्रेस बनवून घेतलाय.

प्रणाली मोरे

Parineet-Raghav Engagement: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचा सोहळा आज दिल्लीत रंगणार आहे. १३ मे हा दिवस या कपलसाठी एकदम खास असणार आहे. परिणीती गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच राहते आहे आणि आपल्या साखरपुड्याच्या तयारीवर लक्ष ठेवून आहे.

परिणीतीनं आपल्या पहिल्या वेडिंग फंक्शनला खास बनवण्यासाठी डिझायनर मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेल्या आऊटफिटला पसंत केलं आहे. तर राघव चड्ढा यांनी आपल्या डिझाईनर असलेल्या मामाकडून खास आऊटफिट बनवून घेतला आहे.

परिणीतीला आपल्या साखरपुड्यातील लूक एकदम सिंपल पण आकर्षक वाटेल असा हवा होता. तसंही आजकाल मिनिमल मेकअप ट्रेन्ड आहे. अशामध्ये परिणीतीनं खूपच सटल रंगाच्या ड्रेसला आपल्यासाठी पसंती दिल्याचं कळत आहे. परिणीती-राघवच्या साखरपुड्याची थीमही पेस्टल कलर बेस्ड आहे. म्हणजेच सगळं काही साधं पण तरीही एलिगेंट पद्धतीनं होणार आहे.

परिणीती चोप्रा साखरपुड्यात गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान करणार आहे. हा लेहेंगा बॉलीवूडचा फेव्हरेट डिझायनर मनिष मल्होत्रानं डिझाईन केला आहे. अभिनेत्रीनं पेस्टल आणि एकदम सोबर रंगाला पसंती दिली आहे. परिणीतीला एकदम हेवी आणि जास्त वर्कवाला ड्रेस पसंत नाही त्यामुळेच साखरपुड्यासाठी तिनं एकदम शितल रंगाला पसंती दिली आहे.

तर दुसरीकडे परिणीतीचे होणारे पतीदेव राघव चड्ढा यांनी आपल्या आयुष्यातील एकदम खास दिनी आवडीचा डिझायनर ड्रेस बनवून घेतला आहे. राघव चड्ढा यांचे मामा पवन सचदेवा हे देखील डिझायनर आहेत. त्यांनी राघव चड्ढा यांच्यासाठी खादी सिल्कचा ड्रेस डिझाइन केला आहे, ज्याला आयवरी रंगाची पॅंट आणि मॅचिंग कुर्त्यासोबत टीमअप केलं आहे.

राघव -परिणीतीच्या साखरपुड्याच्या सोहोळ्याची सुरुवात सुखमनी पाठनं होईल. यानंतर जवळपास ५ वाजल्यापासून साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होईल. दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहोळा रंगणार आहे. परिणीती राघवच्या साखरपुड्यात बॉलीवूडमधील अनेकजण सामिल होणार आहेत असं कळतंय.

अभिनेत्रीची बहिण आणि हॉलीवूड स्टार प्रियंका चोप्रा साखरपुड्यात सामिल होण्यासाठी लंडनहून दिल्लीला रवाना झाली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापासून अनेक राजकीय नेते या सोहोळ्यात सामिल होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT