Parineeti And Raghav  esakal
मनोरंजन

Parineeti And Raghav: राघवच्या पावलांवर पाऊल ठेवत परिणीती घेणार राजकारणात उडी? अभिनेत्रीनं केला खुलासा

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चढ्ढा हे नेहमीच लाईमलाईटचा विषय राहिले आहेत.

युगंधर ताजणे

Parineeti And Raghav : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चढ्ढा हे नेहमीच लाईमलाईटचा विषय राहिले आहेत. चाहत्यांचे अफाट प्रेम त्या दोघांनाही मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचे लग्न झाले. त्याला केवळ बॉलीवूडच नाहीतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

परिणीती ही एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिला तिच्या वैवाहिक नात्यावर काही प्रश्न विचारण्यात आले होते. तिनं तिला मोकळेपणानं उत्तर दिले. त्यात एका प्रश्नावरुन सध्या वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. परिणीती तुझा राजकारणात येण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती जे काही बोलली त्यावरुन पुन्हा वेगळ्याच प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

परिणीती आणि राघव चढ्ढा यांनी तीन महिन्यांपूर्वी राजस्थान मध्ये ग्रँड वेडिंग केले होते. काही वेळ सासरी राहिल्यानंतर आता अभिनेत्रीनं आता बॅक टू वर्क स्टार्ट केले आहे. ई टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, परिणीतीनं तिला विचारण्यात आलेल्या राजकीय प्रवेशावर भाष्य केले आहे.

तुम्ही मला माझ्या पॉलिटिकल इंट्री विषयी विचारता आहात, पण तुम्हाला सांगते माझ्या पतीला राघवला बॉलीवूडमधील फारशी माहिती नाही. आणि तसेच मला राजकारणाविषयी काही माहिती नाही. त्यामुळे मला चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना सांगायचे आहे की, त्यांना मला राजकारणात पाहता येणार नाही. अशा शब्दांत परिणीतीनं तिची प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही दोघेही सेलिब्रेटी आहोत. त्यामुळे आम्हाला नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागणार हे माहिती आहे. आम्हाला पूर्ण देशाकडून एवढं प्रेम मिळाले आहे की, आम्ही सध्या आमच्या संसारावर लक्ष केंद्रीत करत आहोत. बाकी बॉलीवूडचे खूप सारे प्रोजेक्ट देखील आहे. असे परिणीतीनं त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

Disha Patni : दिशा पटनीच्या वडिलांची झाली फसवणूक ; अध्यक्ष बनवण्यासाठी तब्बल 25 लाखांचा गंडा

अख्खं कुटुंबच उद्‌ध्वस्त झाल्याने चांदीनगरी हळहळली; शत्रूच्याही वाट्याला न यावा असा दुर्दैवी प्रसंग, नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT