Parineeti-Raghav Wedding Venue 
मनोरंजन

Parineeti-Raghav Wedding Venue : या भव्य पॅलेसमध्ये होणार परिणीती-राघवचं लग्न, बघा पॅलेसचा शाही थाट

Parineeti Chopra and Raghav Chadha wedding | उदयपूरचे शानदार हॉटेल 'द लिला पॅलेस' राघव परिणीतीच्या लग्नासाठी बुक करण्यात आले आहे

साक्षी राऊत

Parineeti-Raghav Wedding Venue : तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूर शहरात परिणीती आणि राघव चढ्ढाच्या लग्नासाठी शाही पॅलेस अगदी सजून तयार आहे. या जोडप्याच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी पॅलेसमध्ये शानदार तयारी करण्यात आली आहे.

उदयपूरचे शानदार हॉटेल 'द लीला पॅलेस' राघव परिणीतीच्या लग्नासाठी बुक करण्यात आले आहे. चला तर यांच्या लग्नाच्या नियोजनाबाबत आणि लग्नासाठी बुक करण्यात आलेल्या शाही पॅलेसबाबत सविस्तर जाणून घेऊया.

नवरोबा बोटीतून पोहोचणार नवरीकडे

मिळालेल्या माहितीनुसार, राघव चढ्ढा दुसऱ्या एका हॉटेलमदून बोटीतून 'द लीला पॅलेस'ला पोहोचणार आहेत. ही बोट मेवाडी पारंपारिक स्टाइलने सजवण्यात येणार आहे.

देशातील प्रसिद्ध शेफ्सची उपस्थिती

जोडप्याच्या लग्नासाठी देशातील प्रसिद्ध शेफ्सना आमंत्रित करण्यात आले आहे. हे शेफ्स पंजाबी स्टाइलचे चविष्ट असे जेवण पाहुण्यांसाठी बनवतील. शिवाय पाहुण्यांच्या स्वागतासाठी मेवाडी स्टाइल घूमर नृत्य प्रदर्शित होईल.

शाही पॅलेसच्या प्रत्येक खोलीचा दिवसाचा खर्च असणार १० लाख...

पॅलेसमधील शाही सुइट्सबाबत (सर्व सुविधांनी सज्ज, प्रशस्त हॉटेलमधील खोली) बोलायचे झाल्यास त्याचे रोजचे भाडे १० लाख एवढे आहे. असे अनेक सुइट्स पॅलेसमधील एकूण ३५०० एकरात पसरले आहेत.

जगातील बेस्ट हॉटेल्सपैकी एक 'द लीला पॅलेस'

परिणीती आणि राघवने त्यांच्या लग्नासाठी शानदार हॉटेल बुक केले आहे. 'द लीला पॅलेस' हे जगातील १०० बेस्ट आणि भारतातील टॉप ५ मध्ये येणाऱ्या हॉटेल्सपैकी एक आहे. या हॉटेलला न्यू यॉर्कच्या ट्रॅव्हल मॅग्झिनने २०१९ मध्ये जगातील १०० बेस्ट हॉटेल्सच्या यादीमध्ये स्थान दिलेय.

हॉटेलमधून दिसतो विलक्षण सुंदर नजारा

चौहीकडे पर्वतरागांनी आणि तलावांनी वेढलेल्या या पॅलेसमधून बाहेरचे दृष्य विलक्षण सुंदर दिसते. प्रत्येक खोली तवालाचे विलक्षण सुंदर दृष्य बघायला मिळेल. इथून ताज पॅलेस, सिटी पॅलेस आणि आरावली हिल्सचे सुंदर दृष्यसुद्धा दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT