parineeti raghav wedding update priyanka chopra nick jonas not attend wedding in india udaipur SAKAL
मनोरंजन

Parineeti Raghav Wedding: बहिणीच्या लग्नाला प्रियंका चोप्रा राहणार गैरहजर, सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

बहिण परिणीती चोप्राच्या लग्नाला प्रियंका येणार नाही अशी चर्चा आहे

Devendra Jadhav

Parineeti - Raghav Wedding Update News: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा अवघ्या काही तासात एकमेकांशी लग्न करणार आहेत. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वांना उत्सुकता होती.

परिणीती - राघव यांच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आलीय. परिणीती - राघवच्या लग्नासाठी प्रियंका चोप्रा गैरहजर राहणार, अशी चर्चा आहे. प्रियंका चोप्राने बहिणीसाठी खास पोस्ट शेअर लिहीलीय.

प्रियंका चोप्राने बहिणीसाठी लिहीली खास पोस्ट, लग्नाला येणार नाही?

प्रियंका चोप्राने बहीण परिणीतीचा एक खास फोटो शेअर केला आणि पोस्ट लिहीलीय , 'मला आशा आहे की, तुम्ही तुमच्या या खास दिवशी तितकेच आनंदी आणि समाधानी असाल. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करते. एका नवीन सुरुवातीसाठी खुप शुभेच्छा.

अशी पोस्ट लिहीत अभिनेत्रीने राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांना रेड हार्ट इमोजीसह टॅग केले आहे.

आता या पोस्टवरून प्रियंका सध्या परदेशा असून ती परिणीतीच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तिची आई मधू चोप्रा सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.

उदयपूर एअरपोर्टबाहेर पाहूण्यांचं ग्रँड स्वागत

परिणीती आणि राघव उद्या २४ सप्टेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. ANI ने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत उदयपूर एअरपोर्टबाहेर मोठमोठे होर्डींग्ज लावलेले पाहायला मिळत आहे. परिणीती - राघवच्या लग्नासाठी पाहूणे आणि या दोघांचे मित्र-मैत्रिणी विविध ठिकाणांहून उदयपूरला रवाना झालेत.

अशातच या दोघांचे लग्नासाठी आलेल्या पाहूण्यांचं जय्यत स्वागत करण्यात येत आहे. एअरपोर्टवर वाद्य वाजवत भांगडा डान्स करत अदाकार पाहूण्यांचं वेलकम करत आहेत.

परिणीती - राघवच्या लग्नासाठी कडक नियम

२४ सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला आणि द ताज लेक पॅलेसमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

निक जोनस आणि प्रियंका या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. या सोहळ्याला जे मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यांना मोबाईल फोनची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांनी फोन घरी किंवा जिथे राहण्याची व्यवस्था केली असेल तिथे ठेवून सोहळा अटेंड करण्यासाठी यावे. असे सांगण्यात आले आहे.

मोबाईलमधून वेडिंग फोटो काढणे, शुट करणे याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे वेगळ्या प्रकारची माहिती सोशल मीडियातून व्हायरल होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT