Parineeti Raghav Wedding Viral social media grand ceremony  esakal
मनोरंजन

Parineeti Raghav Wedding : परिणीतीचा फुल्ल जोशमध्ये भांगडा, राघव चढ्ढांनांही बसला धक्का!

युगंधर ताजणे

Parineeti Raghav Wedding Viral social media grand ceremoney : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यांच्या लग्नाच्या पूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले आहे. आता तर एका कार्यक्रमामध्ये परिणीती चोप्रानं केलेला भांगडा हा देखील नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा विषय आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सुफी नाईट्सच्या फंक्शनमध्ये परिणीती आणि तिचा होणारा पती राघव हे दोघेही आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये दिसून आले. यावेळी त्यांचे निवडक मित्रही त्या सोहळयासाठी हजर होते. दोघांच्या लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याशिवाय कडक सुरक्षाव्यवस्था असल्यामुळे फोटो आणि व्हिडिओ बाहेर जाणार नाहीत. याची काळजी घेतली गेली आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

दुसरीकडे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या डान्सचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा विषय आहे. त्यांनी त्या दोघांचेही कौतुक केले आहे. यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजन सिंगही सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

हरभजन सिंह हा तेरा यार बोलदा या गाण्यावर डान्स करताना दिसतो आहे. तर राघव आणि परिणीती हे दोघंही त्याला साथ करताना दिसत आहेत. राघवनं डार्क ब्ल्यु रंगाचा सूट परिधान केला आहे तर परिणीती ही सिल्व्हर आऊटफिटमध्ये दिसते आहे. या कार्यक्रमामध्ये परिणीतीची बहिण प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राची आई मधू आणि भाऊ सिद्धार्थ देखील हजर होते. प्रियंका अजून भारतात आली नसून ती लग्नापूर्वी भारतात येईल. असे बोलले जात आहे.

२३ आणि २४ सप्टेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूरमध्ये परिणीतीच्या लग्नाचे आणखी काही विधी होणार आहेत तर २४ सप्टेंबर रोजी राघवची सेहराबंदी होणार आहे. दुपारी लग्न होणार असून लग्नानंतर सायंकाळी चंदीगढमधील ताज हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT