Paris Hilton Delivered A Girl:  Esakal
मनोरंजन

Paris Hilton: पॅरिस हिल्टन सरोगसीद्वारे दुसऱ्यांदा झाली आई! मुलीचं नाव ऐकल्यानंतर नेटकरी शॉक

Vaishali Patil

Paris Hilton welcomes second child with husband Carter Reum: लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल पॅरिस हिल्टन ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. पॅरिसनं पती कार्टर रियमसोबत सरोगसीद्वारे आपल्या लेकीचं स्वागत केलं.

पॅरिसने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. यापोस्टमध्ये तिने तिच्या लेकीचे नाव देखील सांगितले आहे.

पॅरिस हिल्टनने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात तिने गुलाबी रंगाच्या एका ड्रेसचा फोटो शेयर केला आहे. या ड्रेसवर तिने मुलीचे नाव लिहिले आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या ड्रेसवर लंडन लिहिले आहे.

पॅरिसने तिच्या लेकीचे नाव लंडन ठेवले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, Thankful for my baby girl.'

पॅरिस 2021 मध्ये कार्टर रियमसोबत लग्न बंधनात अडकली होती. तिने पहिल्या मुलाचे स्वागतही सरोगेसीद्वारेच केले होते. त्याचे नाव त्यांनी फिनिक्स ठेवले होते. आता लेकीचं स्वागत करुन त्यांनी तिचं नाव लंडन ठेवलं आहे.

तर या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या पॉडकास्टमध्ये तिने सांगितले होते की फिनिक्ससाठी लंडन नावाची छोटी बहीण मिळाल्याने ती खूप उत्साहित आहे.

याच पॉडकास्टमध्ये तिने लेकीचं नाव लंडन का ठेवले याचा खुलासा केला होता. लंडन हे तिचे आवडते शहर आहे. त्यामुळे तिला तिच्या मुलीचे नाव लंडन ठेवायचे होते. तिने हे नाव दहा वर्षापुर्वीच ठरवलं होतं. तिला हे नाव खुप आवडते.

सध्या पॅरिसच्या लेकीची आणि तिच्या नावाची सोशल मिडियावर खुप चर्चा आहे. नेटकरींना हे नाव ऐकल्यानंतर आश्चर्य वाटत आहे तर अनेकांनी तिला नाव बदलण्याचा सल्लाही दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT