Pathaan Advance Booking in Foreigh Countries,broke kgf 2 records Google
मनोरंजन

Shahrukh Khan: 'पठाण' काही ऐकेना..'केजीएफ 2' ला मागे टाकत रिलीज आधीच नोंदवला मोठा रेकॉर्ड

पठाण सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून वादांमुळेच चर्चेत होता पण आता Advance Booking मधील त्याच्या बंपर कमाईचे आकडे हैराण करणारे आहेत.

प्रणाली मोरे

Shahrukh Khan: शाहरुख खान,दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम यांच्या 'पठाण' सिनेमाची सगळेच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमा २५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. पण सिनेमाच्या Advance बुकिंगला मात्र जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे.

रिपोर्ट्सनुसार आता माहिती समोर येत आहे की रिलीज आधीच 'पठाण'ने साऊथ सुपरस्टार यश च्या 'केजीएफ २' चा रेकॉर्ड तोडला आहे.(Pathaan Advance Booking in Foreigh Countries,broke kgf 2 records)

समोर आलेल्या माहितीनुसार युएइ,जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिनेमाचं जबरदस्त बुकिंग झालं आहे. आतापर्यंत ३५०० हून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये पठाणच्या बुकिंगविषयी बोलायचं झालं तर तिकडे एकाच ठिकाणी जवळपास ३००० तिकीटांची विक्री झाली आहे. सर्व मिळून १ लाख १५ हजार डॉलर हून अधिक किमतीच्या तिकिटी आतापर्यंत परदेशात विकल्या गेल्या आहेत.

हा आकडा पाहिला तर केजीएफ२ च्या अॅडव्हान्स बुकिंगपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. जर्मनीविषयी बोलायचं झालं तर जर्मनीमध्ये पुढील पाच आठवड्यांसाठी जवळपास ८५०० हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. फक्त फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी ४००० हून अधिक तिकीटं विकली गेली आहेत. हा आकडा पाहून वाटतंय की 'पठाण' खूप सहज 'दिलवाले' चा रेकॉर्ड तोडेल.

हेही वाचा: आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनी बॉक्सऑफिसवर कमबॅक करत आहे. बॅक टू बॅक सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख खानने कामातून थोडा ब्रेक घेतला आहे. 'पठाण' च्या माध्यमातून तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. आणि चाहत्यांना त्याच्या या सिनेमापासून खूप आशा आहेत. आता पहायचं हा सिनेमा बॉक्सऑफिसवर काय कमाल करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

PM Narendra Modi: उद्याच्या संविधान दिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण होणार नाही; विरोधकांनी केली भाषणाची मागणी

IPL 2025 Auction Live: अर्जुन तेंडुलकरवर मुंबईनेही दाखवला नाही विश्वास; लिलावात राहिला 'अनसोल्ड'

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

SCROLL FOR NEXT