Pathaan Box Office Collection Esakal
मनोरंजन

Pathaan Box Office Collection: 'पठाण' हजार करोडच्या क्लबमध्ये करणार एंट्री! 12 व्या दिवशीही बोलबाला!

सकाळ डिजिटल टीम

Pathaan Box Office Collection: शाहरुख खान , दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा स्पाय थ्रिलर चित्रपट 'पठाण' अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानला उगाच बादशाह म्हटले जात नाही हे त्याने पठाणद्वारे हे सिद्ध केले आहे. किंगनं बॉक्स ऑफिसवर धडाक्यात आगमन केलं आणि आता तो थांबण्याचं नावं घेत नसल्याचं दिसतंय.

शाहरुखच्या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्याने सर्वांनाच हैराण केले आहे. दररोज चाहत्यांची नजर चित्रपटाच्या रोजच्या कलेक्शनवर असते. अशा स्थितीत पठाणच्या बाराव्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. पठाणला दुसऱ्या वीकेंडचाही जबरदस्त फायदा झाला आहे. या आठवड्याच्या सुरवातीला पठाण बॉक्स ऑफिसवर थोडा सुस्तावला होता. मात्र विकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारी पुन्हा त्याने उसळी मारली आणि चांगलाच गल्ला जमवला.

आता बॉक्स ऑफिसवर 12 व्या दिवशी तब्बल 28 कोटींची कमाई करण्यात यश आले आहे. Sacnilk नुसार, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 429 कोटी रुपये आहे. व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या मते, पठाणने दुसऱ्या रविवारी भारतात 28 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दुसरीकडे, रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार पठाणने जगभरात 850 कोटींचा व्यवसाय केला आहे.

बालाने असेही सांगितले की 'पठाण' यूएसमधील गोल्डन ग्लोब विजेत्या चित्रपट आरआरआरचा विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले, "पुन्हा रिलीजसह, #RRRMovie ने #NorthAmerica मध्ये $14,861,603 गल्ला जमवला तर पठाण आधीच $14 दशलक्ष क्लबमध्ये प्रवेश केला आहे आणि लवकरच तो RRR च्या कलेक्शनला मागे टाकेल."

अवघ्या 12 दिवसांत एवढा मोठा आकडा पार करणारा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. शाहरुख खानने 4 वर्षांनंतर 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन केले . तो अखेरचा 'झिरो' चित्रपटात दिसला होता, जो फ्लॉप ठरला होता. शाहरुख खानकडे अॅटलीचा 'जवान' आणि राजकुमार हिराणीचा 'डंकी'हे चित्रपटही आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT