बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने चार वर्षांच्या ब्रेकनंतर 'पठाण' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण रिलिज होण्यापुर्वीच हा चित्रपट बराच वादात अडकला. त्यात दिपिकानं भगव्या रंगाचीच बिकिनी का घातली असं म्हणत बराच वाद झाला.
त्यानंतर शाहरुखवरही अनेक आरोप करण्यात आले मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली. किंग ऑफ रोमान्सचा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'पठाण' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' या ब्लॉकबस्टर चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. त्याचबरोबर हा चित्रपट प्रदर्शित होऊन एवढा कालावधी लोटल्यानंतरही चित्रपटगृहांवर त्याचा बोलबाला आहे. शाहरुख खानच्या बहुतेक चाहत्यांनी हा चित्रपट आतापर्यंत पाहिला आहे. चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आता याबाबत अनेक धक्कादायक आणि रंजक खुलासे केले आहेत.
या चित्रपटातील शाहरुख खानचे 'पठाण' हे पात्र कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असल्याचे दाखवण्यात आलेले नाही. मात्र, एका दृश्यात जेव्हा दीपिका त्याला विचारते की तू मुस्लिम आहेस का? तर याला उत्तर देताना 'पठाण' सांगतो की, त्याला सिनेमागृहात टाकून दिलेल होत आणि एका अफगाण खेड्यात काही मुलांना वाचवल्यामुळे त्याचे नाव 'पठाण' ठेवण्यात आले होते. पुढे शाहरुख म्हणाला की, तो दरवर्षी त्या गावाला भेट देतो.
पठाणच्या याच विधानाकडे अधिक लक्ष देत चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी 'पठाण' हा अमर, अकबर आणि अँथनीसारखा असल्याचं म्हटलं आहे. या कारणास्तव पठाणचा कोणत्याही धर्मावर भर नव्हता.
पठाणच्या ओटीटी रिलीजवर सिद्धार्थ आनंदनेही मोठा खुलासा केला असून या माहितीमुळे चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. सिद्धार्थ आनंदने सांगितले की चित्रपटात काही भाग एडिट केले गेले आहेत, ते ओटीटी रिलीजमध्ये पाहिले जाऊ शकतात.
सिद्धार्थ आनंदने आपल्या मुद्यावर ठामपणे सांगितले की, 'त्याला नाव नाही हे खरे आहे आणि तो एका थिएटरमध्ये भेटला ज्याला प्रत्यक्षात नवरंग म्हणतात... त्याला संपादित करण्यात आलं होतं परंतु तुम्ही ते OTT वर पाहू शकता.
शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्यासोबत 'जवान' चित्रपटात दिसणार आहे. ऍटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 2 जूनला हा चित्रपट चित्रपटगृहात रिलिज होईलं. त्याचबरोबर तो तापसी पन्नूसोबत 'डंकी' मध्येही दिसणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.