shah rukh khan, pathaan, pathaan press conference SAKAL
मनोरंजन

Pathaan: फ्लॉप सिनेमांमुळे वैतागला होता शाहरुख.. बॉलीवूड सोडून करणार होता हा व्यवसाय

शाहरुख खाननं एक पत्रकार परिषद घेतली होती.

Devendra Jadhav

Shahrukh Khan Press Conference: जगभरात पठाणचा धुमाकूळ सुरू आहे. पाचशे करोडचा टप्पा ओलांडत किंग खानच्या पठाणनं आता १००० कोटी करण्याकडे आपली घोडदौड सुरू केली आहे. तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकलेल्या शाहरुखनं वयाच्या ५७ व्या वर्षातही चाहत्यांना वेड करायची ताकद आजही आपल्यात आहे हे दाखवून दिलंय. पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये बादशहा एकच हे सिद्ध झालं आहे.

आज पठाणचं यश आपल्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी..त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी शाहरुख खाननं एक पत्रकार परिषद घेतली होती. शाहरुखसोत जॉन अब्राहम आणि दीपिका पदूकोण सोबत पठाणची संपूर्ण टीम हजर होती. यावेळी शाहरुखनं आपण बॉलीवूड सोडणार होतो...असा धक्कादायक खुलासा केल्यानं सगळेच हैराण झाले आहेत. नेमकं काय म्हणालाय किंग खान याविषयी..चला जाणून घेऊया.

शाहरुख खानने पठाण निमित्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी शाहरुख खान मनातलं बोलला. शाहरुख म्हणाला,"माझा याआधीचा सिनेमा फ्लॉप झालेला. गेली ४ वर्ष खूप वेगळ्या अवस्थेत गेलेली. मी वैतागलो होतो. एकावेळी मी इंडस्ट्री सोडण्याचा विचार करतो. मी या काळात जेवण बनवायला शिकलो. मी फूड बिझनेस करण्याच्या विचारात होतो. त्याचं नाव ठेवणार होतो Red chilies food Italy.."

शाहरुख पुढे म्हणाला, "जर हा सिनेमा फ्लॉप झाला असता तरी मला लोकांचं तेवढंच प्रेम मिळालं असतं. मी नशीबवान आहे. मला जेव्हा सुख वाटत , दुःख हॉटन तेव्हा मी बाल्कनीत येतो. मला देवाने आयुष्यभराचं बाल्कनीचं तिकीट दिलंय"

मिळालेल्या माहितीनुसार पठाणनं आतापर्यत जगभरातून ५५० कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी पठाणनं देशभरातून ८० कोटींची कमाई केली होती. सध्या देशात सुरु असणाऱ्या पठाण फिव्हरनं ट्रोलर्सची झोप उडवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT