payal Rohatgi apologises to payal rohatgi apologises to indian muslims after allegedly calling zeeshan khan a terrorist  Google
मनोरंजन

पायलनं मुसलमानांची मागितली माफी; वादग्रस्त विधानानं ओलांडली होती मर्यादा

कंगनाच्या 'लॉकअप' शो मधील पायल रोहतगी आणि जिशान खान यांच्यात एका बातमीवरुन वाद रंगला होता.

प्रणाली मोरे

कंगना रनौत(Kangana Ranaut)च्या 'लॉकअप'(Lockup Show) शो मध्ये दिवसागणिक भांडणं आणि हाणामारीचे भयानकर प्रकार वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच शो मधील स्पर्धक पायल रोहतगी(Payal Rohatgi) आणि जिशान खान यांनी तर टोकाची भूमिका घेत जोरदार भांडण केलं होतं. भांडणा दरम्यान पायलने जिशानवर ताशेरे ओढताना मुस्लिम धर्मीयांवर कमेंट करीत त्यांना 'दहशतवादी' म्हटलं होतं. त्यानंतर शो मधील सर्वच स्पर्धक पायल रोहतगीच्या विरोधात गेले होते. या खळबळजनक विधानानंतर एका दिवसांतच पायलने भारतीय मुसलमानांची माफी मागितली आहे.

एलिमिनेशन राऊंडमधनं निशा रावलला शो मधून बाहेरचा रस्ता दाखवताना शो ची होस्ट कंगना रनौतनं पायलला ती या आठवड्यासाठी सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पायल रोहतगी जेलमधील कॅमेऱ्याजवळ गेली अन् तिनं भारतीय मुसलमानांची माफी मागितली. ती म्हणाली,''नमस्कार मी पायल रोहतगी. जर मी कुणाच्या सामाजिक भावना दुखावल्या असतील तर खरंच मी मनापासून माफी मागते. प्रत्येक भारतीय मुसलमानाची मी हात जोडून माफी मागत आहे. सॉरी. मी तुम्हाला विनंती करते की मी जे काही बोलले त्याचा चुकीचा अर्थ घेऊन वाद निर्माण करू नका. मला आशा आहे की या शो बरोबरच प्रत्येकातल्या 'मी' चा सर्वनाश होईल''.

पायल आणि जिशान यांच्यात मोठं भांडण झालं होतं. निमित्तं ठरलं कर्नाटकात 'हलाल मटण' वर बंदी आणण्याच्या मागणीची बातमी. जी 'लॉकअप' शो मध्ये दाखवण्यात आली. त्यानंतर पायल आणि जिशान यांच्यात या बातमीवर चर्चा झाली. पण पुढे ही चर्चा काही वेळातच भांडणामध्ये परावर्तित झाली. यांच्यातला वाद इतका वाढला की त्याला धार्मिक वळण लागलं. आणि मग पायलने मुस्लीमांना 'दहशतवादी' म्हटल्यानं चर्चात्मक वादाचा विस्फोट झाला. त्यानंतर 'लॉकअप' मधील सगळेच स्पर्धक पायलला शो मधून बाहेर काढण्याची मागणी करू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT