phulala sugandh maticha fame harshad atkari new serial kunya rajachi ga tu rani on star pravah sakal
मनोरंजन

Marathi Serial: कीर्तीचा शुभम पुन्हा गाजवणार छोटा पडदा! अभिनेता हर्षद अतकरी नव्या भूमिकेत..

नीलेश अडसूळ

स्टार प्रवाहच्या दुर्वा आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता हर्षद अतकरी पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाहच्या कुन्या राजाची गं तू रानी या नव्या मालिकेत हर्षद हरहुन्नरी अश्या पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. दुर्वा मालिकेतील केशव आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम या त्याने साकारलेल्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय.

आजही त्याला प्रेक्षक केशव आणि शुभम या नावांनी हाक मारतात. 'कुन्या राजाची गं तू रानी 'या मालिकेतील तो साकारत असलेलं कबीर हे पात्र अतिशय वेगळं आहे. त्यामुळे हर्षद आता कबीरच्या रुपात प्रेक्षकांना दररोज भेटणार आहे.

(phulala sugandh maticha fame harshad atkari new serial kunya rajachi ga tu rani on star pravah)

स्टार प्रवाह वाहिनीसोबत हर्षदचं जुनं नातं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी तो प्रचंड उत्सुक आहे. कारण या वाहिनी वरील त्याच्या सर्वच मालिका खूप गाजल्या. किंबहुना इथूनच्या त्याच्या यशाला सुरुवात झाली.

'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेतील या भूमिकेविषयी सांगताना हर्षद म्हणाला, ‘कबीर हे पात्र मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आहे. कबीर हा तळागाळात जाऊन काम करणारा पत्रकार आहे. मालिकेचं कथानकही खूप छान आहे.'

पुढे तो म्हणाला, 'कामावर प्रचंड प्रेम करणारा असा हा कबीर साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिका संपल्यानंतर पुन्हा कधी भेटीला येणार याची सतत विचारणा होत होती.'

'योग्य वेळी ही सुवर्णसंधी चालून आली आणि मी तातडीने या भूमिकेसाठी होकार दिला. माझ्या याआधीच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम कुन्या राजाची गं तू मालिकेतील कबीरवर करतील याची खात्री आहे.' येत्या १८ जुलै पासून ही मालिका सुरू होणार आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT